शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील चार जिल्ह्यांमध्ये २३.४0 टक्के जलसाठा

By admin | Updated: July 6, 2014 23:37 IST

वर्‍हाडातील धरणांची जलपातळी घसरली असून, चारही जिल्हय़ातील धरणांची जलपातळी २३.४0 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.

अकोला : पावसाळा लांबल्याने वर्‍हाडातील धरणांची जलपातळी घसरली असून, चारही जिल्हय़ातील धरणांची जलपातळी २३.४0 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. अकोला जिल्ह्यात १९.५0, वाशिम १९.५७ तर बुलडाणा जिल्ह्यात २५.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.यावर्षी प्रचंड तापमान व पावसाला होत असलेल्या विलंबामुळे वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यातील धरणांमधील जलपातळी घसरत चालली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने वर्‍हाडातील पाच जिल्हय़ांतील जलसाठे ओसंडून वाहत होते. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा प्रकल्पात २0.१३ दलघमी म्हणजे २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, पातूर तालुक्यातील मोर्णा या प्रकल्पात ३0 टक्के व निगरुणा धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात केवळ ३ टक्के जलसाठा शिलक्क असून, दगडपारवा प्रकल्पाचा जलसाठा शून्यपातळी खाली गेला आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या मोठय़ा सिंचन प्रकल्पात ३१ टक्के, ज्ञानगंगामध्ये ४१, मस २७ , कोराडी ४९ व पलढग धरणात २0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा सिंचन प्रकल्पात १९ टक्के तर याच जिल्हय़ातील लोअरपूस धरणामध्ये ५२, सायखेडा ४३, गोकी २२, वाघाडी २८ व बोरगाव सिंचन प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी व सोनल हे मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित सात लघु प्रकल्प मिळून केवळ १९.१७ टक्के जलसाठा आहे.