शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

२३०० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:20 IST

राज्य शासनाने घोषित केल्यानुसार कर्जमाफीचा आदेश अखेर सहकार विभागात धडकला. या आदेशानुसार

तीन लाख शेतकरी : २००९ पासूनच्या थकबाकीदारांना लाभरूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने घोषित केल्यानुसार कर्जमाफीचा आदेश अखेर सहकार विभागात धडकला. या आदेशानुसार जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना तब्बल २३०० कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांनी ५ जूनला राज्य कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अध्यादेशात १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंतच्याच थकबाकीदार शेतकऱ्यांना माफी देण्याचे नमूद होते. त्यातून २०१२ पूर्वीचे थकबाकीदार शेतकरी वगळण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन केले. कर्जमाफीच्या अध्यादेशाची होळी करून संताप व्यक्त केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थितीचा संबंधित पालकमंत्र्यांकडून आढावा घेतला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सीच्या माध्यमातून सहकार विभाग व बँक अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. नंतर कर्जमाफीचा सुधारित अध्यादेश काढण्यात आला.राज्य शासनाने काढलेल्या नवीन अध्यादेशात आता १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी दीपक राणे यांच्या स्वाक्षरीचा हा अध्यादेश येथील सहकार विभागात धडकला आहे. या सुधारित अध्यादेशानुसार जिल्ह्यातील तीन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना २३०० कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता बँकांना याद्या तयार कराव्या लागणार आहे. या यादीत नेमका कुणाचा समावेश होतो, याची आता उत्सुकता आहे. तथापि तीन लाख शेतकऱ्यांना या यादीत स्थान मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. अग्रीम कर्ज वाटपाचे आदेश धडकलेराष्ट्रीयकृत बँकांनी विभागीय कार्यालयाकडून सूचना नसल्याने शेतकऱ्यांना तातडीचे १० हजारांचे कर्ज देण्यास आखडता हात घेतला. आता या बँकांना त्यांच्या विभागीय कार्यालयाकडून तातडीचे कर्ज वाटपाच्या सूचना आल्या. यामुळे पात्र शेतकऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत तातडीचे १० हजार रूपये मिळण्यास मदत होणार आहे.सचिवांच्या संपामुळे याद्या अडकल्यानवीन आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार कराव्या लागतील. मात्र ग्राम विविध सहकारी संस्थांचे सचिव विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपावर आहे. त्यांचा संप अद्याप सुरूच आहे. हा संप मिटल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांच्या याद्या करण्याची भूमिका त्यांनी घेतली. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.