शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात २३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. नागरिकांना आरोग्यासह विविध सुविधा पुरविल्या जात आहे. नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जात आहे. मात्र कोरोनाला पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देएकूण संख्या ६२ : तिघांचा मृत्यू, उपाययोजनांना आला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२ वर पोहोचली. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला असून ३६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ आहे. परंतु दिवसेंदिवस रुग्णांमध्ये भर पडत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. नागरिकांना आरोग्यासह विविध सुविधा पुरविल्या जात आहे. नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जात आहे. मात्र कोरोनाला पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या काळात केवळ एक रुग्ण असलेल्या दारव्हा शहरात नंतर वेगवेगळ्या कनेक्शनमधून पाच जणांना लागण झाली. त्यांच्या नजीकच्या संपर्कात येणारे अनेकजण बाधित झाल्याने आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६२ वर पोहोचला आहे. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला.शहरात अचानक ज्या वेगाने रुग्णांची वाढ झाली, त्यामुळे प्रशासन हादरून गेले आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात दाखल होऊन संपूर्ण मोर्चा आपल्या हातात घेतला. शहरात पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार केले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या घराच्या १00 मीटर अंतरावरील व संपर्कात येणाºयांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येत आहे. सतत आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. या सर्व बाबींचा नियमित डाटा तयार करून जिल्हाधिकाºयांना पाठविला जात आहे. त्यानुसार सूचना देऊन नवीन चमूकडून काम करून घेतले जात आहे.जिल्हाधिकारी एम.डी. सिंग शहराला भेट देऊन परिस्थितीचा सतत आढाव घेत आहे. तहसीलदार डॉ.संतोष डोईफोडे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, मुख्याधिकारी धीरज गोहाड, वैद्यकीय अधीक्षक गजानन खरोडे, ठाणेदार मनोज केदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.खलील बेग, उपजिल्हाधिकारी दळवी, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, प्रभारी तहसीलदार संजय जाधव, नायब तहसीलदार होटे, तुपसुंदरे, कापडे यांच्यासह महसूल प्रशासन, शासकीय रुग्णालय, नगरपरिषद, पोलीस, यासह संबंधित स्थानिक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी २४ तास परिश्रम घेत आहे.दुकानांच्या वेळात आजपासून बदलशहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता १५ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. आता पुन्हा रुग्ण वाढल्याने पोलीस ठाण्यात अधिकारी आणि व्यापारी बांधवांच्या बैठकीत रविवारपासून सर्व व्यवहार सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या