शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांत २२९ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: March 17, 2017 02:50 IST

महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

महागाव तालुक्यात नापिकी : साहेबराव पाटलांच्या आत्महत्येची धग महागाव : महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. चिलगव्हाण येथील साहेबराव पाटलांच्या आत्महत्येनंतरही अद्यापपर्यंत आत्महत्तेचे सत्र थांबले नाही. आता १९ मार्च रोजी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. महागाव हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या ३० हजार आहे. बहुतांश कुटुंब केवळ शेतीवरच उपजीविका करतात. परंतु गत काही वर्षांपासून नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती खालावली. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. महागाव तालुक्यात एका पाठोपाठ एक २२९ शेतकऱ्यांनी १६ वर्षात मृत्यूला कवटाळले आहे. महागाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडवाहू आहे. शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. सिंचनासाठी वेणी प्रकल्प असला तरी अद्यापपर्यंत त्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. अशा परिस्थितीत महागाव तालुक्यावर निसर्गाची अवकृपा असते. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत जातात. त्यातूनच आत्महत्या होत आहे. शासकीयस्तरावर केवळ पॅकेजेस दिले जात असले तरी ठोस उपाययोजना मात्र होत नाही. आता १९ मार्च रोजी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाने महागाव तालुका पुन्हा चर्चेत आला असून शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आहे. महागावसारखीच अवस्था जिल्ह्यातील इतरही तालुक्यांची आहे. दररोज आजही कुठे ना कुठे आत्महत्या होत असल्याने आकडे फुगत चालले आहेत. (शहर प्रतिनिधी)