शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘बोंडअळी’चे २१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:06 IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला ....

ठळक मुद्देमदत निधी : १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला असून येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना या निधीचे वाटप केले जाणार आहे.शासनाने बोंडअळीग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्यानंतर सदर मदत दोन टप्प्यात मिळणार होती. त्यानुसार वणी तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी ८० लाख ७१ हजार २११ रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी तालुक्यातील ९२ गावांतील १३ हजार ५८५ शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ७०० रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील निधी वितरीत झाल्यानंतर तालुक्यातील ७३ गावांतील १४ हजार ७३० बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा होती. मात्र बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा निधी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.निधी प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने तपासणी सुरू केली आहे.शासनाने जाहीर केल्याप्रमाणे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळू नये, याची खबरदारी महसूल विभागाकडून घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली, त्या शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या टप्प्यातील यादीत आहे काय, याची तपासणी महसूल विभागाकडून केली जात आहे. या तपासणीनंतर लाभार्थ्यांची यादी तयार करून ती बँकेकडे धनादेशासह दिली जाणार आहे. त्यानंतर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.मागील वर्षी पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने कपाशीचे पीक जोमात वाढले. चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा असताना अचानक कपाशीवर बोंडअळीचा हल्ला झाला. बोंडअळीच्या उद्रेकाने हजारो हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग केले. वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या केल्या. त्यातून विषबाधेसारख्या जीवघेण्या घटना घडल्या. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा शेतकऱ्यांवर असे संकट कोसळले.वणी विभागात अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसानयंदा पावसाने कहर केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. सूर्यदर्शन अभावानेच होत आहे. या वातावरणाचा परिणाम शेती पिकावर होत आहे. सततच्या पावसाने शेतात कचरा झाला असून तो काढण्यासाठीही पाऊस उसंत देत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. अतिपावसामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.