शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २१ दूरदर्शन केंद्रे बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 20:16 IST

केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्यातील २१ दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रे येत्या ३१ मार्चला मध्यरात्रीपासून बंद केले जाणार आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेडसह विदर्भातील सात प्रक्षेपण केंद्रांचा समावेश आहे.

ठळक मुद्देविदर्भातील सात २५० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

प्रकाश लामणे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्यातील २१ दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रे येत्या ३१ मार्चला मध्यरात्रीपासून बंद केले जाणार आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेडसह विदर्भातील सात प्रक्षेपण केंद्रांचा समावेश आहे.केंद्र शासनाच्या प्रसार भारतीअंतर्गत देशात दूरदर्शनचे लघु प्रक्षेपण केंद्र कार्यरत आहे. यापैकी राज्यातील २१ प्रक्षेपण केंद्र ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३ मार्चला त्यासंबंधीचा ई-मेल संबंधित प्रक्षेपण केंद्रात धडकला. मात्र हे प्रक्षेपण केंद्र नेमके का बंद करण्यात येत आहे, याबाबत ई-मेलमध्ये कोणताही खुलासा देण्यात आला नाही. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, भंडारा जिल्ह्यातील तुमसर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलडाणा जिल्ह्यातील चिखली व खामगाव या सात केंद्रांचा बंद होणाºया केंद्रात समावेश आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील किनवट, सोलापूरमधील अकलूज, बदलापूर, खोपोली, महाड, म्हसले, पंढरपूर, परभणी, संगमनेर, सांगली, शहादा, शिर्डी, शिरपूर, उमरगा आदी केंद्राही बंद होणार आहे. या सर्व केंद्रांवरील प्रक्षेपण ३१ मार्चला मध्यरात्रीपासून बंद होणार आहे.

बहूतांश खासदार-आमदार अंधारातहे प्रक्षेपण केंद्र बंद करण्याबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. हे केंद्र बंद होणार असल्याने राज्यातील २५० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना इतरत्र समायोजन करण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे.देशातील १२५ केंद्रांचा समावेशमहाराष्ट्रातील २१ लघु प्रक्षेपण केंद्रांसह देशभरातील तब्बल १२५ लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. प्रसार भारतीच्या मुख्य कार्यालयातून या सर्व लघु प्रक्षेपण केंद्रांना ई-मेल पाठविण्यात आला. त्यात ओरिसा राज्यातील दहा, बिहार एक, झारखंड एक, पश्चिम बंगाल एक, आसाम तीन, मेघालय एक, हरियाना चार, राजस्थान १३, उत्तर प्रदेश सात, झारखंड दोन, आंध्र प्रदेश आठ, कर्नाटक १५, तामीळनाडू दोन, तेलंगणा सात, चंदीगड चार, गुजरात १५ आणि मध्य प्रदेशातील दहा दूरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Governmentसरकार