शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

२० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By admin | Updated: November 23, 2014 23:27 IST

आम आदमी विमा योजना सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे विमा संरक्षण देणारी योजना ठरली आहे. योजनेंतर्गत लाभधारक नागरिकांना विम्याचे कवच देण्यासोबतच त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचाही

आम आदमी विमा योजना : १ कोटी १९ लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरणयवतमाळ : आम आदमी विमा योजना सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे विमा संरक्षण देणारी योजना ठरली आहे. योजनेंतर्गत लाभधारक नागरिकांना विम्याचे कवच देण्यासोबतच त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचाही लाभ मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अशा लाभधारकांच्या तब्बल २० हजारावर मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची ही रक्कम १ कोटी १९ लाख इतकी होती. आम आदमी विमा योजना ही अतिशय महत्वाकांशी योजना आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येते. आर्थिक दुर्बलांना आधार देण्यासाठी ही विमा योजना असून महसूल विभागाच्यावतीने योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. तालुकास्तरावर पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे विमा अर्ज एलआयसीकडे भरल्या जात आहे. या योजनेसाठी कोणत्याही प्रवगार्तील लाभार्थी पात्र असून लाभार्थ्यांचे वय १८ ते ५९ वर्ष वयोगटातील तसेच लाभार्थी भूमिहीन किंवा पाच एकर पेक्षा कमी जमीन धारण करणारा शेतकरी असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत जवजवळ दोन लाखांवर नागरिकांनी आपला विमा उतरविला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या पाल्यांना योजनेंतर्गत शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. एका विमाधारक व्यक्तीच्या दोन पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. योजनेच्या पहिल्या वर्षी सन २००९-१० मध्ये केवळ ६ विद्यार्थ्यांना ४ हजार ८०० इतक्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली होती. सन २०११-१२ मध्ये ७३ विद्यार्थ्यांना ४ लाख ३८ हजार रुपये शिष्यवृत्तीच्या रुपात देण्यात आले. यानंतर सातत्याने या योजनेचे लाभधारक वाढल्याने व या लाभधारकांच्या पाल्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर शिष्यवृत्ती देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याने सन २०१२-१३ मध्ये शिष्यवृत्तीचा आकडा ३४ लाख ३९ हजारावर पोहचला होता. यावर्षी जिल्ह्यातील ५७३३ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली होती. गेल्यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्तीची मोहीम राबविण्याने १३ हजार १३२ विद्यार्थ्यांना ७९ लक्ष रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण २० हजार ७० विद्यार्थ्यांना शिष्यृत्ती वितरीत करण्यात आली असून शिष्यवृत्तीची रक्कम १ कोटी १९ लाख इतकरी आहे. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९३१ विद्यार्थ्यांच्या याद्या प्राप्त होत असून या विद्यार्थ्यांना आणखी ५ लाख ५८ हजार इतकी शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. आम आदमी विमा योजनेंतर्गत प्रति विद्यार्थी प्रति माह शंभर रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांस अन्य कोणत्याही योजनेतून शिष्यवृत्ती दिली जात असली तरीही आम आदमी विमा योजनेंतर्गत सदर विद्यार्थी पात्र ठरत असल्यास ही शिष्यवृत्ती दिली जाते. आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी असलेल्या नागरिकांनी या शिष्यवृत्तीसाठी आपल्या पाल्यांचे अर्ज संबंधित शाळेमार्फत भरुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)