शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपल्यानंतरही २० हजार शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:47 IST

नाफेडने मुदत संपल्याने मंगळवारपासून जिल्ह्यातील तूर खरेदी बंद केली आहे. परिणामी नोंदणीकृत २० हजार शेतकऱ्यांपुढे आपली तूर आता कुठे विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.

ठळक मुद्देतूर खरेदी : मुदतवाढीसाठी जिल्ह्याचा राज्याकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नाफेडने मुदत संपल्याने मंगळवारपासून जिल्ह्यातील तूर खरेदी बंद केली आहे. परिणामी नोंदणीकृत २० हजार शेतकऱ्यांपुढे आपली तूर आता कुठे विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपली तूर कवडीमोल भावात विकावी लागेल.खुल्या बाजारात तुरीचे दर गत काही वर्षांपासून कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीचा निर्णय घेतला. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात १४ केंद्रावर खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश पणन विभागाने दिले होते. १८ एप्रिलपर्यंत शेतकºयांना आपल्या तुरीची आॅनलाईन नोंदणी करावयाची होती. जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांनी तुरीची आॅनलाईन नोंदणी केली. दरम्यानच्या काळात विविध कारणांमुळे नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर गोंधळ झाला. बारदाणा नाही, गोदाम उपलब्ध नाही, आदी कारणांमुळे ही खरेदी मंदावली. परिणामी मंगळवार १५ मे रोजी मुदत संपल्यानंतरही जिल्ह्यातील २० हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेतच राहिले.खुल्या बाजारात तुरीचे दर घसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ओढा नाफेडच्या केंद्राकडे होता. शासनाचा हमी दर ५४५० आहे. तर खुल्या बाजारात तुरीचा दर ४१०० रुपये आहे. १३५० रुपयांची तफावत असल्याने नाफेडच्या तूर केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. ३५ हजार शेतकºयांपैकी १५ हजार शेतकऱ्यांना आपली तूर विकता आली. आता २० हजार शेतकऱ्यांकडे सुमारे एक लाख क्ंिवटल तूर आहे. ही तूर कुठे विकावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने या केंद्राला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ मिळाल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकतो. परंतु मुदतवाढ मिळाली नाही तर कवडीमोल भावात तूर विकण्याशिवाय पर्याय नाही.३० कोटींचे चुकारे अडलेशेतकºयांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे आतापर्यंत ७० कोटी रुपयांचे चुकारे दिले आहे. त्यानंतरही तब्बल ३० कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेच नाही. तूर खरेदी झालेले चुकारे मिळाले नाही म्हणून आणि तूर खरेदी झाली नाही म्हणून नोंदणीकृत असे शेतकरी अडचणीत सापडले आहे. आता राज्य शासन काय निर्णय घेते यावर भविष्य अवलंबून आहे.