शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री २० चोऱ्या

By admin | Updated: June 11, 2014 00:16 IST

दारव्हा रोडवर पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री एकाच वेळी चोरीच्या एक दोन नव्हे तर तब्बल २० घटना घडल्या आहैेत. त्यातील ११ घटना एकट्या वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर नऊ यवतमाळ शहर

दारव्हा रोड : माजी आमदाराच्या फ्लॅटचा समावेशयवतमाळ : दारव्हा रोडवर पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री एकाच वेळी चोरीच्या एक दोन नव्हे तर तब्बल २० घटना घडल्या आहैेत. त्यातील ११ घटना एकट्या वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर नऊ यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीतील आहेत. चोरीच्या या मालिकेने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेषीवर टांगली गेली आहे. तसेच नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारव्हा मार्गावर सोमवारी रात्री २ वाजतापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. जसराणा अपार्टमेंटमधील संजय रामटेके , मनोज जयस्वाल, झोपाट, डॉ. संतोष जिभकाटे यांच्या फ्लॅटला निशाणा बनविण्यात आले. त्यात केवळ रामटेके यांच्याकडील १० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला. उर्वरीत फ्लॅटमध्ये विद्यार्थी रहात असल्याने आणि काही रिकामे असल्याने चोरट्याची निराशा झाली. जसराणा अपार्टमेंटच्या ए-टू या इमारतीमधील डॉ. सुधांशिव, मनोज जयस्वाल आणि शहा यांच्या फ्लॅटमध्ये चोरटे शिरले. मात्र तेथेही चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी तेथीलच रॉयल हेरीटेज अपार्टमेंटकडे मोर्चा वळविला. तेथे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, बँक व्यवस्थापक अजमिरे यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. सुदैवाने दोन्ही फ्लॅट रिकामे होते. त्यानंतर रॉयल पॅलेस अपार्टमेंटमध्ये चोरटे शिरले. हिवरीचे वनपाल व्ही. जी. तोडसाम, पहाडेकर, कोसारे आणि रंगारी यांच्या फ्लॅटच्या दाराच्या कड्या तोडल्या. या अपार्टमेंटच्या मागील सीडाम यांच्या घरातून तीन हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी दारव्हा नाक्यावरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या अमोल जांभळे, चेतन पांडे, रमेश शहाकार, प्रभाकर जाधव, बालू रामेकर आणि पिंटू मोकाशे यांच्या सहा पान टपऱ्या फोडल्या. तत्पूर्वी चोरट्यांनी महावीर नगर भाग एक आणि दोन मध्ये दोन घरफोड्या केल्या. महिनाभरापूर्वी जसराणा अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री सहा फ्लॅटमध्ये चोरी केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा मोहिम राबवून २० ठिकाणी चोऱ्या केल्या. त्यापैकी केवळ सहा घटनांची फिर्याद देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)