शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२० शाळांचे मुख्याध्यापक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:13 IST

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले नसल्याचे कारण पुढे करून जिल्ह्यातील २० शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन शिक्षण विभागाने रोखले आहे. मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने या मुख्याध्यापकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देवेतन रोखले : कारवाई नियमबाह्य, माध्यमिक शाळा संघाचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले नसल्याचे कारण पुढे करून जिल्ह्यातील २० शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन शिक्षण विभागाने रोखले आहे. मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने या मुख्याध्यापकांची आर्थिक कोंडी झाली आहे. वेतन रोखण्याचा प्रकार नियमबाह्य असल्याचे निवेदन जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना दिले आहे.जिल्ह्यातील काही शाळांचे शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांचे समायोजन इतर ठिकाणी केले जात आहे. काही शाळांनी या शिक्षकांना रुजू करून घेतले नाही. याबद्दल मुख्याध्यापकांवरच वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली. समायोजनाची जबाबदारी संस्थेवर आहे. मात्र शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना वेठीस धरले आहे. विशेष म्हणजे सदर प्रकाराबाबत संस्थेवर कारवाई करावी, असे शिक्षणमंत्र्यांनी सूचविले. तरीही मुख्याध्यापकांना जबाबदार धरले गेले. गृह राज्यमंत्री रंजित पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यांनीही शिक्षणाधिकाºयांशी यासंदर्भात चर्चा केली. आठ दिवसात वेतन दिले जाईल, असे सांगितले. परंतु अजूनही ही कारवाई झाली नाही.मुख्याध्यापकांना वेतन न दिल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा संघाने दिला आहे.निवेदन देताना जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, कृती समिती अध्यक्ष निरज डफळे, सचिव भुमन्ना बोमकंटीवार, विदर्भ प्रतिनिधी पांडुरंग साखरकर, उपक्रम समिती प्रमुख विजय वीसपुते, भीमराव गायकवाड, विजय कडू, सुरेश अग्रवाल, एस.बी. भारंबे, भाऊ दुगड, भाऊ जगताप, मुकुंद बावने आदी उपस्थित होते.