शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२० रेती तस्करांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:15 IST

तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून उमरखेड महसूल पथकाने गुरुवारी पहाटे कोप्रा येथील रेतीघाटावर धाड टाकून २० रेती तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकोप्रा घाट : मराठवाड्यातील आरोपींची पथकाला धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून उमरखेड महसूल पथकाने गुरुवारी पहाटे कोप्रा येथील रेतीघाटावर धाड टाकून २० रेती तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व तस्कर हे मराठवाड्यातील असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.उमरखेड तालुक्यातील कोप्रा नदी पात्रातून मराठवाड्यातील हिमायतनगर येथील तस्कर रेती चोरत असल्याची गोपनीय माहिती उमरखेड महसूल विभागाला मिळाली. गुरुवारी पहाटे ४ वाजता पथक प्रमुख तलाठी दत्तात्रय दुर्केवार व कर्मचाºयांनी कोप्रा घाट गाठला. त्यावेळी अनेकजण वाहनाद्वारे रेती तस्करीत करीत असल्याचे आढळले. पथक पोहोचताच अंधाराचा फायदा घेवून तस्कर वाहनासह पसार झाले. त्यापैकी एका ट्रॅक्टरचालकास पकडले. घटनेची तक्रार तलाठी दत्ता दुर्केवार यांनी उमरखेड ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी अब्दुल बाकी हाजी अब्दुल करीम, परमेश्वर मारोती गायकवाड, देवानंद पांडुरंग गायकवाड यांच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.ही कारवाई ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी केली. आरोपी देवानंद गायकवाडला अटक केली. या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.पैनगंगा नदीतून खुलेआम तस्करीउमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. या तस्करांची हिम्मत एवढी वाढली आहे की धाड टाकण्यास गेलेल्या पथकावर हल्ला करतात. गुरुवारी पहाटेही तस्करांनी हल्ला केला. विशेष म्हणजे उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी तस्करांविरुद्ध मोहीम उघडली आहे. परंतु तस्करांच्या आक्रमक भूमिकेमुळे पथक निष्प्रभ ठरले आहे.अवैध गौण खनिजाचे उत्खनन करणाºया तस्करांच्या मुस्क्या आवळण्यासाठी फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहे. अनेक तस्कर महसूल प्रशासनाच्या रडावर असून रेती चोरट्यांची गय केली जाणार नाही.- भगवान कांबळेतहसीलदार, उमरखेड