शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

उमरखेड तालुक्यात होणार २० कोटींचे वन उद्यान

By admin | Updated: May 1, 2015 02:04 IST

शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वन उद्यान निर्माण करण्याची योजना कार्यान्वित केलीे.

उमरखेड : शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वन उद्यान निर्माण करण्याची योजना कार्यान्वित केलीे. दिवंगत उत्तमराव पाटील यांच्या नावाने असलेल्या या योजनेची घोषणा अधिवेशन काळात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत उमरखेड शहराला लागून असलेल्या अंबोना तलाव परिसरात वनविभागाच्या जागेवर हे उद्यान होणार आहे. यासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.वन व वनेत्तर जमिनीवरील जैव विविधता व निसर्ग संरक्षण या माध्यमातून प्रस्थापित करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी आमदार राजेंद्र नजरधने, वनविभागाचे अधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी नियोजित उद्यान स्थळाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर आमदार राजेंद्र नजरधने यांनी यासंदर्भातील माहिती पत्रकारांना दिली. प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये शासनाची पडिक जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अशा जमिनीचे सौंदर्यीकरण करून विकास करणे हे या योजनेत अभिप्रेत आहे. यामध्ये शहरालगत असलेल्या जमिनीवर वृक्ष लागवड करणे, उद्यान निर्मिती करणे, लहान मुलांना मनोरंजन व खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी, बसण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही विकासाची कामे करताना पाणीपुरवठा, विजेची उपलब्धता, संरक्षण आदी सुविधांवर विशेष भर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या उद्यानामध्ये विविध प्रकारचे वृक्ष, विविध ऋतुंमध्ये बहरणारी फुलझाडे, सावली देणाऱ्या प्रजातींची लागवण करणे, मुलांसाठी उद्यानामध्ये खेळणी बसविणे, कारंजे बसविणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी पायवाट (जॉगिंग पार्क) तयार करणे या सर्व बाबी येथे पर्यावरणाचा समतोल कायम राखून तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात २२ एप्रिल रोजी राज्याचे वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी वनविभागाला दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराला लागून असलेल्या अंबोना तलावाशेजारी वनविभागाच्या जमिनीवर ही योजना पूर्ण केली जात असून त्यासाठी २० कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. अंबोना तलावावर जावून आमदार राजेंद्र नजरधने, सामाजिक वनविभाग अमरावतीचे उपसंचालक व्ही.व्ही. घाटे यांनी संबंधितांना काही सूचना केल्या. (शहर प्रतिनिधी)