शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विकास योजनांचे २० कोटी अडकले अपहारात

By admin | Updated: November 27, 2014 23:41 IST

पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण विकासासाठी थेट केंद्राकडून निधी पुरविण्यात येतो. प्रत्यक्षात ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवकांकडून या निधीमध्ये मोठी अफरातफर केली जाते.

यवतमाळ : पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण विकासासाठी थेट केंद्राकडून निधी पुरविण्यात येतो. प्रत्यक्षात ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवकांकडून या निधीमध्ये मोठी अफरातफर केली जाते. असा १९ कोटी ८१ लाख ३९ हजार ३९० रुपयांचा निधी अपहारात अडकला आहे. तब्बल एक हजार १४१ अपहाराची प्रकरणे अजूनही चौकशीत आहेत. जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर ग्रामपंचायतीत झालेल्या अपहाराची प्रकरणे आली आहेत. एकूण तीन हजार २१९ प्रकरणे आतापर्यंत दाखल झाली आहे. यापैकी दोन हजार २२० प्रकरणांची चौकशी करण्यात आली असून ११ कोटी ४१ लाख नऊ हजार ५२८ रुपये ग्रामसेवकांकडून वसूल करण्यात आले आहेत. मात्र उर्वरित एक हजार १४१ प्रकरणांची चौकशी सुरू असून त्यामध्ये जवळपास २० कोटी रुपये अडकले आहेत. ग्रामीण विकासासाठी शासनस्तरावरून मोठमोठ्या योजना आखल्या जातात. मात्र त्या योजना राबविताना संबंधित यंत्रणेकडून गावपातळीवर मोठा अपहार केला जातो. अनेक ठिकाणी तर ग्रामसेवकांनी बदली होवूनही आपला पदभार हस्तांतरितच केलेला नाही. त्यामुळे योजना राबविल्याबाबतचे अधिकृत दस्तावेजही मिळत नाही. अपहाराची तक्रार होवूनही दस्तावेज नसल्याने चौकशी करणे शक्य होत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक अपहाराची प्रकरणे घाटंजी पंचायत समिती अंतर्गत आहे. त्या खालोखाल पांढरकवडा, दारव्हा, नेर, यवतमाळ, राळेगाव, वणी या पंचायत समितींचा समावेश आहे. शासनाने दिलेला निधी योग्य कामी वापरला जाणे तर सोडाच अपहाराच्या चौकशी प्रलंबित राहात असल्यामुळे हा पैसा वेळेत वसूल करणेही शक्य होत नाही. याला गावपातळीवर केला जाणारा अपहार ही मुख्य बाब कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)