शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

१९ वर्षांपासून फरार आरोपी जंगलात तेंदूपत्ता वेचतोय !

By admin | Updated: May 13, 2016 02:39 IST

जाळपोळ करून नुकसान केल्याप्रकरणातील आरोपी तब्बल १९ वर्षांपासून फरार आहे.

पाचगणीत आश्रय : मृत्यूची चर्चा ‘एलसीबी’ने खोटी ठरविली यवतमाळ : जाळपोळ करून नुकसान केल्याप्रकरणातील आरोपी तब्बल १९ वर्षांपासून फरार आहे. तो जिल्ह्यातच तेंदूपत्ता मजूर म्हणून काम करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने त्याला अटक केली. विठ्ठल देवसिंग पवार (५८) रा. माळेगाव पोलीस ठाणे पारवा, असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पारवा पोलीस ठाण्यात भादंवि ४३५ कलमाखाली सन १९९७ मध्ये (अपराध नं. ४८/९७) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार आहे. दरम्यान तो मरणपावल्याचीही चर्चा माळेगाव परिसरात होती. अनेक वर्ष कुटुंबियांनाही त्याचा थांगपत्ता नव्हता. तो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरनजीकच्या पाचगणी येथे वास्तव्याला होता. महिनाभरापूर्वी तो झरी तालुक्यातील पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कटली बोरगाव येथे काकासोबत तेंदूपत्त्याच्या कामावर रुजू झाला. त्याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार साहेबराव राठोड, पोलीस शिपाई वासू साठवणे, संदीप मेहेत्रे यांच्या पथकाने १९ वर्षांपासून फरार विठ्ठल पवारला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने पाहिजे-फरारी असलेल्या आरोपींच्या शोधार्थ धडक मोहीम हाती घेतली आहे. विठ्ठलची १९ वर्षानंतर झालेली अटक हे या मोहिमेचे फलित मानले जात आहे.