शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीमध्ये १८०२ खटले निकाली

By admin | Updated: July 11, 2017 01:12 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

आपसी तडजोड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हाभरातील १८०२ खटले आपसी तडजोडीने मिटविण्यात यश आले.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (सर्वोच्च न्यायालय दिल्ली) तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (उच्च न्यायालय मुंबई) यांच्या निर्देशावरून ८ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीपकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन झाले. लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांची वादपूर्व प्रकरणेही ठेवण्यात आली होती. ही प्रकरणे मोठ्या संख्येने आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीपकुमार मोरे, सचिव अरविंद भंडारवार, व जिल्ह्यातील न्यायाधीशांनी परिश्रम घेतले. त्यासाठी वेळोवेळी वकील, शासकीय अधिकारी, पक्षकार, विविध संस्थेतील व राष्ट्रीयकृत बँकांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावल्या. त्यांना राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्त्व पटवून दिले. जिल्ह्यामध्ये १६१७ प्रलंबित व १८५ वादपूर्व अशी एकूण १८०२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य १ कोटी ६० लाख ३५ हजार २३७ होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समित्या, सर्व न्यायाधीश व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, भूअर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, सहकारी बँका, संस्थांचे अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व इतर वकील मंडळी, जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी व इतर अनेकांनी यासाठी सहकार्य केले.