शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

१७ हजार शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकेचे दार बंद

By admin | Updated: May 23, 2015 00:01 IST

तालुक्यातील १७ हजार शेतकऱ्यांना पुनर्कजासाठी बँकेचे दार बंद करण्यात आले असून खरीप हंगामात या शेतकऱ्यांना....

कर्जाचे ओझे : केवळ दोन हजार शेतकऱ्यांनाच कर्ज पुरवठा महागाव : तालुक्यातील १७ हजार शेतकऱ्यांना पुनर्कजासाठी बँकेचे दार बंद करण्यात आले असून खरीप हंगामात या शेतकऱ्यांना सावकाराच्याच दारात जावे लागणार आहे. १९ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ दोन हजार शेतकऱ्यांनीच कर्जाची परतफेड केल्याने त्यांनाच नव्याने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. महागाव तालुक्यात गत तीन वर्षांपासून सारखा दुष्काळ पडत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तसेच रबी हंगामात गारपिटीनेही शेतकरी गारद होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात एक पैसाही राहिला नाही. आता खरीप हंगाम ऐन तोंडावर आला आहे. अशा स्थितीत शेतकरी जिल्हा बँकेकडे कर्जासाठी पाठपुरावा करीत आहे. जिल्हा बँकेने गतवर्षी कर्जाचे पुनर्गठण करण्याचे ठरविले होते. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात बँकेने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु शेतकरी हिताचे निर्णय संथ गतीने होत असल्याने शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. बँकेच्या धोरणात बदल होऊन कर्जाचे पुनर्गठण होईल या आशेवर अनेक शेतकरी आहे. १९ हजार शेतकऱ्यातून केवळ दोन हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. यावरून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाची कल्पना येते. १७ हजार शेतकऱ्यांना संजीवनी द्यायची झाल्यास महागाव तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बँकेच्या संचालकांनी जिल्हा बँकेच्या बोर्ड सभेत कर्जाच्या पुनर्गठणाबाबत आवाज उठविण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. अन्यथा कर्ज न मिळाल्यास १७ हजार शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार आहे. (शहर प्रतिनिधी)७७ कोटी वसुलीचे उद्दिष्ट महागाव तालुक्यातील २८ सोसायट्यांमधून वितरित केलेले ७७ कोटी रुपये कर्ज वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी केवळ २ हजार २०० सभासदांनी १० कोटी ३८ लाख रुपये कर्जाची परतफेड केली आहे. चालू कर्जाच्या २५ टक्के वसुली न केल्याने मुडाणा, वरोडी, लेवा, धनोडा, हुडी आणि माळेगाव या सात सोसाट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गतवर्षीच गोठविण्यात आले होते. या सातही सोसायट्यांचे वाटप आता थेट बँकेमार्फत करण्यात येत आहे. कर्जाची परतफेड करण्यात सोसायट्या आणि संबंधित शेतकरी कोठे कमी पडत आहे याबाबत संशोधन करणे गरजेचे आहे.