शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

पुसद-नेर रस्त्यासाठी १६६ कोटी

By admin | Updated: May 4, 2017 00:30 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पुसद-दिग्रस-नेर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १६६ कोटी रुपये मंजूर केले आहे.

चौपदरीकरण : दर्जेदार कामासाठी प्रथमच लिडार मशीनचा वापर पुसद : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पुसद-दिग्रस-नेर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १६६ कोटी रुपये मंजूर केले आहे. या रस्त्याच्या कामात गुणवत्ता राखण्यासाठी प्रथमच लिडार मशीनचा वापर केला जाणार आहे. पुसद-नेर रस्त्याच्या चौपदरीकरणाने या मार्गावरील अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे. पुसद ते नेर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरात दिली आहे. या कामासाठी १६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पुसदपासून नेरपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. याचा फायदा दिग्रस, दारव्हा या तालुक्यांनाही होणार आहे. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने वाहतूक सुकर होणार असून अत्यंत कमी वेळात मराठवाड्यातून अमरावती येथे जाणे शक्य होणार आहे. काम गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी लिडार मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. दोन कोटी रुपये किंमत असलेल्या लिडार मशीनचा उपयोग यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदाच केला जात आहे. या मशीनद्वारे रस्त्याची लेव्हल, मध्यबिंदू काढून रस्त्याचे नूतनीकरण, बांधकाम, डांबरीकरण ही सर्व कामे उच्च दर्जाची केली जातात. विशेष म्हणजे ही मशीन थेट उपग्रहाशी जोडली राहणार आहे. त्यामुळे या कामात पारदर्शकता येऊन काम दर्जेदार होणार आहे. पुसद ते नेर मार्गावर असलेल्या गावावरून हा रस्ता जाणार आहे. आतापर्यंत हा रस्ता दुपरी असल्याने वाहतुकीस अडथळा ठरतो. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. परिणामी वाहनधारक दुसऱ्या पर्यायी रस्त्याचा शोध घेतात. परंतु मराठवाड्यात जाण्यासाठी अमरावतीवरून हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. त्यामुळे वाहनधारकांचा नाईलाज होतो. आता १६६ कोटी रुपये खर्च करून हा रस्ता चौपदरी केला जात आहे. लिडार मशीन पुसद येथे दाखल झाली असून या कामाची पाहणी कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आणि उपविभागीय बांधकाम अभियंता रवींद्र मालवत यांनी केली आहे. यावेळी तंत्रज्ञ ए.आर. राठोड आणि शासकीय कंत्राटदार राजेश आसेगावकरही उपस्थित होते. पुसद ते नेर हा रस्ता लवकरच चौपदरीकरण होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)