शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

१६३ ग्रामपंचायतीत प्रचार शिगेला

By admin | Updated: July 24, 2015 02:15 IST

उमरखेड आणि पुसद उपविभागातील चार तालुक्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून, अवघ्या २४ तासावर मतदान आल्याने उमेदवार जिवाचे रान करीत आहे.

पुसद : उमरखेड आणि पुसद उपविभागातील चार तालुक्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून, अवघ्या २४ तासावर मतदान आल्याने उमेदवार जिवाचे रान करीत आहे. या निवडणुकीत दोन हजार ७७३ उमेदवार रिंगणात असून, निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. पुसद उपविभागात पुसद आणि दिग्रस तालुक्यांचा समावेश आहे. दिग्रस तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ४४६ उमेदवार रिंगणात आहेत. पुसद तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी ८२८ उमेदवार आपले भाग्य अजमावित आहेत. उमरखेड उपविभागातील उमरखेड तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींमध्ये ९७० आणि महागाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींमध्ये ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. गत दहा दिवसांपासून ग्रामपंचायत रणधुमाळीने ग्रामीण वातावरण तापले आहे. पावसाची दडी आणि पिकांची स्थिती नाजूक असतानाही गावागावात केवळ निवडणुकीचीच चर्चा दिसत आहे. २५ जुलैरोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. उरमखेड तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींमध्ये ४२ हजार ५०२ पुरूष तर ३७ हजार १८७ महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मोठ्या आणि गट ग्रामपंचायतींमध्येही निवडणुकीने वातावरण तापले असून प्रचारात तरुणांसोबत महिलांनीही आघाडी घेतली आहे. निवडणुकीत अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्या मार्फत करडी नजर ठेवली जात आहे. दररोज सविस्तर माहिती प्रशासनाला दिली जात आहे. उमरखेड तालुक्यात १७८ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी १९६ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून, ५८८ मतदान अधिकारी राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच गावातही तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असून, अनुचित प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निवडणूक अधिकारी सचिन शेजाळ यांनी सांगितले. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ढाणकीत तिरंगी लढत होत असून, प्रचार कार्याने वेग घेतला आहे. गावात ध्वनीक्षेपक, फ्लेक्स, रॅलीच्या माध्यमातून प्रचार कार्य सुरू आहे. पुसद तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापले असले तरी रोजगारासाठी बाहेर गेलेल्या मतदारांनी उमेदवारांची झोप उडविली आहे. शेकडो मजूर मुंबई, पुण्यासारख्या महानगरात गेले आहेत. या मजुरांना संपर्क करून त्यांना गावात आणण्यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहेत. या विस्थापित मतदारांना आणण्यासाठी हजारो रूपये खर्च होणार असले तरी आपल्याच पारड्यात ते मत टाकतील याची कुणालाही खात्री देता येत नाही. महागाव तालुक्यात हिवरा, फुलासावंगी यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये लोकसभेसारखी रणधुमाळी दिसत आहे. हिवरा येथे १३ जागांसाठी २७ उमेदवार तर फुलसावंगी येथे १७ जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.यासाठी प्रचारामध्ये नेते व कार्यकर्ते रात्रंदिवस एक करीत आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील नेत्यांनी गावांमध्ये ठिय्या दिला आहे. घरोघरी जावून मतदारांना विनंती करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी वाहनातूनही लाऊडस्पिकरद्वारा प्रचार सुरू आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचा भास होतो. (लोकमत चमू)