४१ प्रलंबित : चार उपविभागांचा समावेश, अभयारण्यातील सात सामूहिक दाव्यांचा समावेश यवतमाळ : जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे ४१ दावे अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय चार उपविभागातील १५७ नवीन सामूहिक वनहक्क दावे दाखल करण्यात आले आहे.जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पार पडली. या बैठकीत वनहक्क समिती व उपविभाग, तालुकानिहाय प्राप्त सामूहिक वनहक्कांच्या दाव्यांची माहिती देण्यात आली. त्यात वनालगत असलेली एकूण गावे, डीएलसीने मंजूर केलेली सीएफआर, डीएलसीकडे सादर सीएफआर, एसडीएलसीकडे सादर सीएफआर, ग्रामसभांकडे सादर सीएफआर, सीएफआरची एकूण टक्केवारी सादर करण्यात आली. यात केवळ केळापूर उपविभागातील केळापूर आणि झरी तालुक्यांची टक्केवारी १00 आहे.याच बैठकीत जिल्हास्तरीय वनहक्क समितीसमोर एकूण १५७ सामूहिक वनहक्क दावे ठेवण्यात आले. त्यात केळापूर तालुक्यातील २१, झरी २३, घाटंजी दोन, वणी १३, कळंब १६, पुसद ४९ आणि दिग्रस तालुक्यातील ३३ दाव्यांचा समावेश आहे. तसेच बैठकीत ३४ दावे स्वाक्षरीकरतिा प्रलंबित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यात केळापूर १0, झरी तीन, घाटंजी सात, वणी दोन, मारेगाव तीन आणि राळेगाव तालुक्यातील नऊ दाव्यांचा समावेश आहे. याशिवाय अभयारण्यामधील सात सामूहिक वनहक्क दावे असून त्यात केळापूरमधील पाच, तर घाटंजी तालुक्यातील दोन दाव्यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
सामूहिक वनहक्कांचे १५७ दावे सादर
By admin | Updated: September 26, 2016 02:36 IST