शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम हातपायांसाठी १५५ दिव्यांगांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:36 IST

लोकमत वृत्तपत्र समूह, साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब कॉटन सिटी यवतमाळ, केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वाधवाणी फार्मसी कॉलेज, जिल्हा पोलीस प्रशासन, लायन्स लिओ कॉटन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय तपासणी शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्देलोकमत समूह : साधू वासवानी मिशन, लायन्स, केमिस्टचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकमत वृत्तपत्र समूह, साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब कॉटन सिटी यवतमाळ, केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वाधवाणी फार्मसी कॉलेज, जिल्हा पोलीस प्रशासन, लायन्स लिओ कॉटन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय तपासणी शिबिर घेण्यात आले. रविवारी पोलीस कवायत मैदानावर सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत १५५ दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.दुर्घटनेत हातपाय गमाविणारे, रक्तवाहिनींच्या विकाराने पीडित व्यक्ती आणि गँगरिंग झाल्याने अवयव गमावलेल्या व्यक्तींना सर्वसामान्य जीवन जगता यावे या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात साधू वासवानी मिशनचे प्रकल्प प्रमुख मिलिंद जाधव, सलील जैन यांच्यासह पाच तज्ज्ञ डॉक्टरांची चमू आली होती. या चमूने सकाळी ८ वाजतापासूनच दिव्यांगांचे कृत्रिम हातपाय बनविण्यासाठी तपासणी सुरू केली. शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शनही केले. हे कृत्रिम हातपाय दीड महिन्यांच्या कालावधीनंतर लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. आलेल्या प्रत्येक दिव्यांगांची नोंदणी करून त्यांचा संपर्क क्रमांकही घेण्यात आला. कृत्रिम हातपाय वितरणाबाबत तारीख घोषित केली जाणार आहे. कृत्रिम हातपायाच्या सहाय्याने सामान्य जीवन जगता येऊ शकते, सर्व कामकाज करू शकतात, तेवढेच नव्हे तर सायकल, रिक्षा चालवू शकतात. त्यांना पळता, खेळता येते, नृत्यही करता येते.या शिबिरातून अपंग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत तसेच उमेद मिळते. त्यामुळेच जिल्हाभरातील दिव्यांग व्यक्ती या शिबिरात आले होते. सकाळी ८ ते २ ची ही निर्धारित वेळ असतानाही ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत तपासणी शिबिर चालले.भावना गवळींची भेटदिव्यांगांच्या शिबिराला खासदार भावना गवळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कृत्रिम हातपायांनी किती फायदा होतो, हे दिव्यांगांकडून जाणून घेतले.