शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार शेतकरी कर्जमाफीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ मध्ये १५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. १५० कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांना पाच टप्प्यात परतफेड करायची होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या आदेशानुसार या कर्जाचे पुनर्गठन केले. मात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी राज्य बँकेने जिल्हा बँकेला निधीच उपलब्ध करून दिला नाही. यामुळे नव्याने पुनर्गठीत कर्ज या शेतकऱ्यांना मिळाले नाही.

ठळक मुद्देना कर्ज मिळाले ना कर्जमाफी : पुनर्गठित कर्जदारांचा आदेशात उल्लेखच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवीन कर्जमुक्ती योजनेत पुनर्गठीत कर्जाचा उल्लेख नाही. यामुळे कर्जाचे पुनर्गठन झालेले १५ हजार शेतकरी अडचणीत आले आहे. त्यांना पुनर्गठन झाल्यानंतर नव्याने कर्ज मिळाले नाही. कर्जमुक्ती योजनेतही अशा शेतकऱ्यांची नावे नाही. आता वंचित १५ हजार शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाचीच आवश्यकता आहे.महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच त्यांनी कर्जमुक्ती योजनची घोषणा केली. दोन लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना माफ करण्यात येणार होते. जिल्ह्यात आतापर्यंत ८२ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ मध्ये १५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. १५० कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांना पाच टप्प्यात परतफेड करायची होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या आदेशानुसार या कर्जाचे पुनर्गठन केले. मात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी राज्य बँकेने जिल्हा बँकेला निधीच उपलब्ध करून दिला नाही. यामुळे नव्याने पुनर्गठीत कर्ज या शेतकऱ्यांना मिळाले नाही. आता कर्जमुक्ती आदेश काढताना २०१७ च्या थकीत कर्जाचा त्यामध्ये उल्लेख आहे. मात्र जे कर्ज पुनर्गठीत झाले, त्याचे पाच हप्ते पाडले. त्यानुसार त्याचा परतफेडीचा कालावधी अद्यापही बाकी आहे. यामुळे असे शेतकरी नियमित कर्जदाराच्या यादीत आले आहेत.१५ हजार शेतकरी थकीत आहेत. त्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. कर्जमुक्ती आदेशात कर्ज पुनर्गठनाचा उल्लेखच आला नाही. यामुळे हे शेतकरी २०१७ चे थकबाकीदार असतानाही कर्जमुक्तीला पात्र ठरले नाही. आता या शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी नव्याने अध्यादेशाची आवश्यकता आहे. त्याकरिता धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे असे शेतकरी थकीत असले तरी त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.ही तांत्रिक बाब आहे. अध्यादेशात उल्लेख नसल्याने जिल्हा बँकेचे १५ हजार शेतकरी कर्जमुक्तीला मुकले आहेत. धोरणात्मक निर्णयाची यासाठी गरज आहे.- अरविंद देशपांडे, मुख्य कार्यकारीअधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज