शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराच्या गुन्ह्यात वृद्धाला १५ वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:11 IST

घराशेजारी असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात खेळण्यास बोलावून तिच्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सोमवारी हा निकाल आला.

ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निकाल : कळंब तालुक्यातील शिंगणापूरची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घराशेजारी असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात खेळण्यास बोलावून तिच्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सोमवारी हा निकाल आला.प्रमोद हरिभाऊ झोड (६४) रा. शिंगणापूर ता. कळंब असे शिक्षा झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्याने २९ जानेवारी २०१५ रोजी घराजवळ असलेल्या अल्पवयीन मुलीला खेळायला बोलाविले. तिला खाऊ देऊन दुचाकीवर फिरविण्याचे आमिष दिले. नंतर घरातील गोठ्यात नेऊन तिच्यासोबत लैंगिक चाळे केले.दरम्यान दुपारचे ४ वाजले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून तिची आई तिला शोधत होती. मुलीच्या शोधात ती आरोपीच्या गोठ्याजवळ पोहोचली. तिथे मुलगी कापड घालताना दिसली. तीने मुलीला नेमका काय प्रकार आहे याबाबत विचारणा केली. तोपर्यंत आरोपी प्रमोद झोड हा तेथून निघून गेला होता. पीडित मुलीच्या आईने हा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी पीडितच्या आईने कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वैद्यकीय तपासणी करून या गुन्ह्यात भादंवि ३७६ (२) (८) पोस्को कलम ६ नुसार गुन्हा दाखल केला. उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित व तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीला १५ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश केला. जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी बाजू मांडली.शिरपूरच्या बोगस डॉक्टरला कारावासवणी : तालुक्यातील चारगाव चौकी येथे कुठलीही पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाºया डॉक्टरला वणी न्यायालयाने दोन वर्ष कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. चारगाव चौकी येथील उत्तम सुबोध विश्वास हा वैद्यकीय व्यवसाय करीत होता. याची तक्रार प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत देविदास चांदेकर यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट कलम ३३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. शिरपूर ठाण्यातील सहायक फौजदार प्रकाश तायडे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायाधीश आर.आर. खामटकर यांनी आरोपीला दोन वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा दिली. या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता तुघनायक यांनी बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी प्रकाश कुमरे यांनी सहकार्य केले.