शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळा वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १४ कोटी मंजूर

By admin | Updated: April 4, 2017 00:07 IST

शहराला बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची योजना अमृत योजनेअंतर्गत प्रस्तावित केली आहे.

यवतमाळ नगरपरिषद: उन्हाळ्यात प्रत्येक प्रभागात लागणार दोन टँकर यवतमाळ : शहराला बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची योजना अमृत योजनेअंतर्गत प्रस्तावित केली आहे. या योजनेवर १९६ कोटी ८६ लाख रुपये खर्च होणार आहे. त्यातील २५ टक्के वाटा हा नगरपरिषदेला उचलावा लागणार आहे. यातील पहिला टप्पा म्हणून नगरपरिषदेने १३ कोटी ७८ लाख रुपये देण्याचे मंजूर केले. सोमवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सभेत हा ठराव घेण्यात आला. यवतमाळ शहराचा वाढलेला विस्तार पाहता शाश्वत पाणीपुरवठा योजना असणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून बेंबळा प्रकल्पातील पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या प्रकल्पामध्ये ३० टक्के पाणीसाठा यवतमाळकरांसाठी आरक्षित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया केली असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी पी.एल. आकडे यांनी निविदा भरली आहे. या निविदेप्रमाणे २५ टक्के वाटा नगरपरिषदेला द्यायचा आहे. त्यासाठी पालिकेला अतिरिक्त खर्चाचा बोझा उचलावा लागत आहे. या खर्चाला मंजुरी देण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. नगरपरिषदेने हा ठराव एकमताने मंजूर केला. यावेळी काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती खरोखरच ही रक्कम देण्याइतकी सक्षम आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र पाण्याचा मुद्दा जिव्हाळ्याचा असल्याने त्यावर इतर सदस्यांनी आक्षेप घेऊन ठराव मंजूर करून घेतला. तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रत्येक प्रभागामध्ये दोन पाण्याचे टँकर लावण्याचा निर्णय झाला. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही सभागृहाने मुख्याधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय आणि सर्व समितीचे सभापती, मुख्याधिकारी सुदाम धुपे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)