शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

पाणीटंचाईचे १३८ कोटी दुसऱ्याच योजनांवर खर्च

By admin | Updated: April 27, 2017 00:23 IST

ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या तब्बल १३८ कोटींची दुसरीकडेच विल्हेवाट लावली. पाणी टंचाई उपाययोजना डावलून

चौदावा वित्त आयोग : परस्पर विल्हेवाटीचा भंडाफोड रूपेश उत्तरवार   यवतमाळ ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या तब्बल १३८ कोटींची दुसरीकडेच विल्हेवाट लावली. पाणी टंचाई उपाययोजना डावलून त्यांनी ‘अर्थपूर्ण’ योजनांवर निधी खर्ची घातला. आता उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची ओरड होऊ लागल्याने वास्तव समोर आले. गत दोन वर्षात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून १३८ कोटी रूपये मिळाले. हा निधी प्राधान्याने पिण्याच्या पाण्यावर खर्ची घालावयाचा होता. मात्र ग्रामपंचायतींनी तो दुसरीकडे खर्च केला. परिणामी अनेक गावांमध्ये अद्याप पाणी टंचाई कायम आहे. यावर्षी जिल्ह्यातील ३०८ गावांत पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने कृती आराखड्यात ३३२ उपाययोजना सुचविल्या. त्याकरिता दोन कोटी ८८ लाख रूपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. या आराखड्यात मूळ उद्देशालाच बगल दिल्याचे दिसून आले. यामुळे कृती आराखडा मंजुरीपूर्वीच वादात सापडला. पाणी टंचाईचा विषय जिल्हा परिषदेच्या सभागृहात येताच चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून कुठली कामे केली याचा जाब पंचायत विभागाला विचारला. उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश गायनार यांनी १६ पंचायत विभागाकडून अहवाल मागविला आहे. हा निधी कशावर खर्च झाला. याचा ६२० पानाचा हा अहवाल पंचायत विभागात आला आहे. या अहवालानंतर ग्रामपंचायतींच्या पाणी टंचाई उपाय योजनांना मंजुरी देणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा कसा उपयोग केला याचा लेखाजोखाच समोर येणार आहे. गाव पातळीवर ठोस उपाय योजनासाठी हालचाली होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला हिशेब जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ९५ मुद्यांची गावनिहाय माहिती मागितली आहे. यात गावाला पाण्यासाठी मिळालेला निधी कुठे खर्च झाला, पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायती कोणत्या उपाययोजना करणार आहे, याची माहिती त्यांनी मागितली. गेल्या पाच वर्षात विविध उपाययोजनांवर झालेल्या खर्चाचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या. या सर्व घडामोडीनंतर जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात ठोस उपाययोजनांसह खर्चाचा हिशेब सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यवतमाळात मे महिन्यात आठ दिवसाआड पाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात केवळ १.१६ टक्केच पाणी असल्याने आता मृत साठ्याचा वापर केला जाणार आहे. इमर्जन्सी पंपींग करून शहराला मे महिन्यात आठवड्यातून केवळ एक दिवस पाणी पुरवठा केला जाणार आहे. निळोना जलाशयात केवळ १.१६ टक्के जल शिल्लक आहे. यामुळे मे महिन्यात मृत साठ्याचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी तीन इमर्जन्सी पंप बसविण्यात येत आहे. त्याव्दारे पाण्याचा उपसा करून पाणी जॅकवेलपर्यंत पोहोविले जाणार आहे. सध्या निळोणात गढूळ पाण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा उपसा बंद करून चापडोह प्रकल्पातून पाण्याचा उपसा वाढविला जाणार आहे. परिणामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना जपूनच पाणी वापरावे लागणार आहे.