शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

१३०० शिक्षकांनी चोरली जात

By admin | Updated: June 15, 2016 02:47 IST

जातीच्या आधारावर सवलती लाटणाऱ्या येथील तब्बल १३०० शिक्षकांनी दीड वर्षांपासून निर्देश देऊनही आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.

जिल्हा परिषद : दीड वर्षांपासून निर्देश देऊनही जातवैधता प्रमाणपत्रास टाळाटाळ यवतमाळ : जातीच्या आधारावर सवलती लाटणाऱ्या येथील तब्बल १३०० शिक्षकांनी दीड वर्षांपासून निर्देश देऊनही आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रावरच प्रश्नचिन्ह लागले असून शिक्षकांनीच जात चोरल्याचे पुढे येत आहे. जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याने अनेक प्रक्रियाही रखडल्या आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत शिक्षकांचे बनावट अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या शिक्षकांची तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी अनेक शिक्षकांनी पळ काढला होता. तर चौकशी झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी आपले अपंगत्वाचे प्रमाणपत्रच मागे घेतले होते. याच पद्धतीने आता जिल्हा परिषदेत पदस्थापना मिळविण्यासाठी अनेक शिक्षकांनी जात चोरल्याचे पुढे आहे. अशा शिक्षकांकडून जातीचा लाभ घेतला जात आहे. मात्र त्यासंदर्भात कोणतेच अधिकृत प्रमाणपत्र सादर केले जात नाही. या शिक्षकांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर १३०० एवढी आहे. जातीच्या नावाने फायदा लाटणाऱ्या शिक्षकांना दीड वर्षापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अद्यापपर्यंत या शिक्षकांनी जात वैधता प्रमाणपत्र दिले नाही. वारंवार सूचना देऊनही शिक्षक जात वैधता प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. शिक्षकांनी जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याने प्राथमिक शिक्षकांचे रोस्टर रखडले आहे. बिंदूनामावली तयार केल्याशिवाय रोस्टर काढता येत नाही, ही अडचण दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शिक्षकांची वेतन वाढ रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही प्रमाणपत्र दिले नाही आणि शिक्षकांवरही कारवाई झाली नाही. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी अशा शिक्षकांंना सेवेतून थेट बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अर्धे अधिक शिक्षकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. मात्र कारवाई टाळण्यात पटाईत असलेल्या या शिक्षकांनी आता यातून आपली कशी सुटका करून घ्यावी, यासाठी आराखडे रचने सुरू केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)