शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमजीएसवाय’चे १३०० अभियंते-कर्मचारी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 15:39 IST

Yawatmal News दर्जेदार रस्ते बांधकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील राज्यभरात १३०० पेक्षा अधिक अभियंते-कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून वेतन नाहीशासन दिवाळी तरी गोड करणार काय ?

 लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दर्जेदार रस्ते बांधकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील राज्यभरात १३०० पेक्षा अधिक अभियंते-कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना वेतनच दिले गेलेेले नाही. त्यामुळे आतापर्यंतचे अनेक सण-उत्सव त्यांनी उधारीवर साजरे केले. किमान आता दिवाळीपूर्वी तरी शासनाने वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. 

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत ‘महाराष्ट्र ग्रामीण रस्ते  विकास संस्था’  याची स्थापना करण्यात आली. या संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी ‘पीएमजीएसवाय’ची दर्जेदार कामे पूर्ण केली. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ मध्ये राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. 

५७ हजार किलोमीटर रस्त्यांचे  निर्माण गेल्या पाच वर्षात ‘पीएमजीएसवाय’ टप्पा १ व २ मधून २७ हजार  किलोमीटर, ‘एमएमजीएसवाय’ मधून ३० हजार  किलोमीटर लांबीचे दर्जेदार रस्ते बांधले गेले. ‘पीएमजीएसवाय’मधून टप्पा-३ अंतर्गत पुन्हा साडेसहा  हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे  नियोजन केले जात आहे.  तेथे अभियंते, तंत्रज्ञ, लेखा अशा विविध स्वरूपाची १३०८ पदे मंजूर आहेत. त्यातील ८०० पदे कंत्राटी आहेत. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातून काही अभियंते प्रतिनियुक्तीवर देण्यात आले आहे. मात्र मे-जूनपासून ‘पीएमजीएसवाय’च्या यंत्रणेला पगार मिळालेला नाही. त्यामुळे उसनवार करून कुटुंबाचा गाडा ओढावा लागत आहे. शासनाने या अभियंते, कर्मचाऱ्यांची अडचण ओळखून दिवाळीपूर्वी त्यांचे वेतन अदा करून दिवाळी गोड करावी, अशी मागणी केेली जात आहे.

सहायकापेक्षा कुशल कामगाराला पगार अधिक ‘पीएमजीएसवाय’मध्ये पदवीधर कंत्राटी अभियंत्याला २५ हजार, पदविकाधारकाला २३ हजार, वरिष्ठ व तांत्रिक सहायकाला १३ हजार ८०० तर चालकाला ८ हजार ५० एवढा पगार आहे. त्याचवेळी शासनाच्या दरसूचीनुसार तेथील कुशल कामगाराला ५३९ रुपये तर चालकाला २६८ रुपये प्रतिदिवस असा दर ठरला आहे. सहायकापेक्षा कुशल कामगाराला मासिक पगार अधिक असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Governmentसरकार