शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

‘समन्वय’ची १३ हजार मते संघाच्या जिव्हारी

By admin | Updated: January 19, 2016 03:32 IST

यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आपल्याकडे संपूर्ण राजकीय शक्ती, मंत्री-

संघ परिवारात चिंतन : यवतमाळ अर्बन बँक निवडणूक रद्दची हूरहूर, ‘कॅव्हेट’ दाखल, राखीव निकालावर आज सुनावणीयवतमाळ : यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आपल्याकडे संपूर्ण राजकीय शक्ती, मंत्री-आमदारांसारखे स्टार प्रचारक असतानाही समन्वय पॅनलला मिळालेली १३ हजारांवर मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिव्हारी लागली आहेत. मोटरच्या या लांबलचक प्रवासाने संघ परिवाराला ग्रासले असून आपला आदेश नेमका कुठे अव्हेरला गेला यावर चिंतन केले जात आहे. संघ परिवार कुठेच प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतरणार नाही, अशी घोषणा सरसंघचालकांनी अलीकडेच केली होती. मात्र त्याला छेद देऊन संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय आखाडा लढविला. त्यांनी १८०० कोटींच्या या यवतमाळ अर्बन बँकेची ही निवडणूक सहकार पॅनलसाठी अत्यंत प्रतिष्ठेची केली. भाजपाचे मंत्री, आमदार आणि संपूर्ण संघ परिवार या निवडणुकीत उतरला होता. ते पाहता समन्वय पॅनलच्या उमेदवारांना जास्तीत जास्त दोन ते अडीच हजार मते मिळतील, असा अंदाज होता. मात्र प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी १३ हजारांवर मते घेतली. कुणीही पाठीशी नसताना आणि अखेरच्या क्षणी एक मोठा समाज, शेकडो सैनिक नैराश्यात बुडाले असतानाही समन्वयची मोटार १३ हजार किलोमीटर धावली. नेमकी हीच बाब संघ परिवाराला जिव्हारी लागली. समन्वय पॅनल विजयाच्या जवळपास पोहोचले होते. अखेरच्या क्षणी समाज व सैनिकांवर ‘वार’ झाला नसता तर कदाचित समन्वयने विजयश्रीही खेचून आणली असती, असे मानले जाते. समन्वय पॅनल नेमके कुठे वाढले यावर संघ परिवारात गांभीर्याने चिंतन सुरू आहे. या १३ हजार मतांपुढे सहकार पॅनलला आपली विजयश्री आता ठेंगणी वाटू लागली आहे. समन्वय पॅनलकडून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली जाण्याची शक्यता पाहता सहकारने नागपूर उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केला आहे. दरम्यान तीन उमेदवारांच्या रोखलेल्या निकालावर मंगळवारी १९ जानेवारीला सुनावणी होऊ घातली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)मोठ्या समाजात पडले दोन गट४यवतमाळ अर्बनच्या निवडणुकीत व्यापार क्षेत्रात पाय रोवलेल्या एका मोठ्या समाजातही दोन गट पडले आहेत. या समाजाचे उमेदवार दोनही पॅनलमध्ये उभे असताना या समाजाच्या बँकिंग क्षेत्रातील एका नेत्याने केवळ सहकार पॅनलमधील उमेदवारांसाठीच ‘ताकद’ लावली. त्यामुळे ‘समन्वय’मधील उमेदवार व त्यांचे पाठीराखे नाराज झाले. या नेत्याला धडा शिकविण्यासाठी आता पराभूत समन्वय पॅनलने ‘त्या’ बँकेतही आपले पॅनल उतरविण्याचा निर्धार केला आहे. येथे पराभूत झालो, तेथे पराभूत करु, अशी त्यांची भूमिका आहे. संघाने सहा बँका ताब्यात घेतल्या, आणखी दोन निशाण्यावर ४यवतमाळ अर्बन बँकेच्या निमित्ताने संघ परिवाराने ही सलग सहावी बँक आपल्या ताब्यात घेतली आहे. मूळ संघाची व नंतर संघेत्तरांच्या हातात गेलेल्या बँकांवर संघ परिवाराने लक्ष्य केंद्रीत केले आहे. आतापर्यंत पाच बँका त्यांनी ताब्यात घेतल्या. यवतमाळातही अर्बन बँक ताब्यात घेण्याची व्युहरचना करण्यासाठी संघाने तिघांना पाठविले होते. ४यवतमाळ जिल्ह्यातील आणखी दोन बँका संघाच्या निशाण्यावर आहेत. ‘घरातच लाभार्थी’ या मुद्यावर कायदेशीर लढा देऊन यंदाच जूनमध्ये एका बँकेच्या २० हजार मतदारांचे ‘ब्रेन वॉश’ करण्याचा व या बँकेत संपूर्ण संघाच्या लोकांना संचालकांच्या खुर्चीत बसविण्याचे नियोजन सुरू आहे. विशेष असे, या बँकेत दोन हजारांवर मुस्लिम मतदार आहेत.