संजय खाडे - उकणीवणी पंचायत समितीअंतर्गत जवळपास १२८ गावे आहेत. मात्र त्यांचा कारभार हाकण्यासाठी अवघे ४४ ग्रामसेवक असल्याने ग्रामीण भागाचा विकासच खुंटला आहे.ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा असलेली व विकास कामाला चालना देणारी संस्था म्हणून ग्रामपंचायतीची ओळख आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येतो. या ग्रामपंचायतींवर शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक कार्य करतात. वणी तालुक्यात या पदांवर केवळ ४४ कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे तालुक्यातील १२८ गावांची जबाबदारी आहे. यात काही गट ग्रामपंचायती आहे़ तालुक्यात एकूण १०१ ग्रामपंचायती सध्या कार्यरत आहे़वणी पंचायत समितीअंतर्गत १०१ ग्रामपंचायतींसाठी १० ग्रामविकास अधिकारी व ७२ ग्रामसेवक अशी ८२ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात सध्या केवळ तीन ग्रामविकास अधिकारी व ४१ ग्रामसेवकच कार्यरत आहेत. त्यातही तीन ते चार ग्रामसेवक पंचायत समितीतच कामाला असतात. त्यामुळे प्रत्यक्षात ४० ग्रामसेवकांवरच १०१ ग्रामपंचायती आणि १२८ गावांची जबाबदारी आहे. परिणामी गावांची लोकसंख्या बघून काही ग्रामसेवकांना तीन ते चार गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी अनेक सभा असतात. त्यामुळे ग्रामसेवक महिन्यातून १५ दिवसही गावात पोहोचत नाही़ एकदा सभा संपली की, ग्रामसेवक दुसऱ्याच सभेला उपस्थित होतात. ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे गावाचा विकास होत नाही़ सरपंच व सचिव हे गावातील विकास रथाची दोन चाके आहेत. शासनाच्या विविध नवनवीन योजना शासनाकडून थेट ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येतात. या योजनांची सर्वप्रथम माहिती ग्रामसेवकालाच मिळते. मासिक सभा व ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत योजना पोहोचविल्या जातात. मात्र ग्रासेवकच नसेल, तर ग्रामस्थांपर्यंत माहिती पोहोचणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१२८ गावांचा कारभार ४४ ग्रामसेवकांवर
By admin | Updated: August 16, 2014 23:43 IST