शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१२८ शिक्षक जाणार जिल्ह्याबाहेर

By admin | Updated: June 13, 2017 01:18 IST

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या.

आंतरजिल्हा बदली : रोस्टरच पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष पदस्थापनेबाबत संभ्रमलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. सोमवारी ग्रामविकास विभागाने केलेल्या प्रक्रियेत जिल्ह्यातील १२८ शिक्षकांचा समावेश असून ते आता जिल्ह्याबाहेर जाणार आहेत. परंतु, जिल्ह्यातील रोस्टरच पूर्ण झालेले नसताना या शिक्षकांच्या बदलीची पुढील कागदोपत्री प्रक्रिया अडण्याची शक्यता आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गृहजिल्ह्यात जाण्यासाठी शिक्षक प्रतीक्षेत होते. परंतु, रोस्टरच पूर्ण झालेले नसल्याने आंतरजिल्हा बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यंदा ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी इच्छूक शिक्षकांकडून ‘सरल’वर माहिती मागविण्यात आली होती. अखेर सोमवारी १२ जून रोजी शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया आॅनलाईन पूर्ण करण्यात आली. बदली झालेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची यादी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली. यात यवतमाळ जिल्हा परिषदेतील १२८ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. ११७ शिक्षक मराठी माध्यमाचे तर ११ उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा यात समावेश आहे. सोमवारी बदल्यांची यादी अंतिम झाली. मात्र, प्रत्यक्ष बदली होण्यापूर्वी शिक्षकांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना संबंधित जिल्ह्यात पदस्थापना मिळणार आहे. परंतु, कागदपत्रांची पडताळणी करतानाच जिल्ह्याच्या अपूर्ण रोस्टरचा मुद्दा अडथळ्याचा ठरणार आहे. विभागीय आयुक्तांकडे रोस्टरचा प्रश्न यापूर्वीच शिक्षक संघटनांनी मांडला असता आयुक्तांनी रोस्टर पूर्ण करण्याचे निर्देश सीईओंना दिले होते. मात्र, सोमवारी प्रत्यक्ष बदलीची आॅनलाईन प्रक्रिया झालेली असतानाही रोस्टर पूर्ण करण्याबाबत दिरंगाईच दिसून आली. शिवाय, बदली झालेल्या १२८ जणांमध्ये जे मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक आहेत, त्यांना उपशिक्षक म्हणून पदावनत केल्यानंतरच बदलीच्या ठिकाणी त्यांना पदस्थापना मिळणार आहे. येणाऱ्या ३०० शिक्षकांसाठी फक्त ३७ रिक्तपदे आॅनलाईन बदल्या झालेल्या असल्या तरी रोस्टर पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष बदल्या कठीण आहे. यवतमाळसह चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांचे रोस्टरच पूर्ण झाले नसून तेथील रिक्त पदांची स्थिती स्पष्ट झालेली नाही. यवतमाळात इतर जिल्ह्यातून बदली झालेल्या शिक्षकांची संख्या आॅनलाईन प्रक्रियेत सुमारे तीनशे आहे. पण यवतमाळ जिल्हा परिषदेने आयुक्तांकडे पाठविलेल्या रोस्टरमध्ये केवळ खुल्या प्रवर्गातील ३७ पदे रिक्त दाखविण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या आणि इतर जिल्ह्यातून यवतमाळात येणाऱ्या शिक्षकांचा प्रत्यक्ष पदस्थापनेचा मार्ग खडतर झाला आहे.३६ शिक्षक जाणार विदर्भाबाहेरआंतरजिल्हा बदलीच्या यादीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील ९२ शिक्षक विदर्भातीलच इतर जिल्ह्यात जाणार आहेत. तर ३६ शिक्षक विदर्भाबाहेर जाणार आहेत. यात अमरावती जिल्ह्यात २१, अकोला ३, वाशीम २६, नागपूर ३, वर्धा ७, चंद्रपूर १०, बुलडाणा १०, नांदेड १४, हिंगोली जिल्ह्यात ६ शिक्षकांची बदली झाली आहे. तसेच सोलापूर, परभणी, बिड, अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर गडचिरोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, पुणे, जळगाव, जालना, सिंधुदुर्ग, ठाणे, नंदूरबार जिल्ह्यात एक-एक शिक्षक जाणार आहे. उर्दू माध्यमाच्या ११ पैकी ८ शिक्षक अमरावती तर ३ शिक्षक वाशीममध्ये जातील.