शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पुसदमध्ये १६ वर्षात १२२ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: March 29, 2017 00:29 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यात गत १६ वर्षात तब्बल १२२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

पुसद : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यात गत १६ वर्षात तब्बल १२२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यापैकी शासनदरबारी ५८ आत्महत्या पात्र तर तब्बल ६४ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. तर वर्षभरात १२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची माहिती आहे. सततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा डोंगर यामध्ये फसलेला कास्तकार, जीवन कसे जगायचे? या विवंचनेतून ‘एक्झीट’ होतानाचे विदारक चित्र तालुकाभर पाहायला मिळत आहे. मागील वर्षभरात १ जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत तब्बल १२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. २०१६ मध्ये २४ जानेवारीला चिंचघाट येथील रामकृष्ण पवार, १२ एप्रिलला नांदुरा (ईजारा) येथील विजय चव्हाण, १७ एप्रिल रोजी फुलवाडीच्या किसन राठोड १८ मे रोजी कारला (देव) येथील विलास राठोड, २९ जून रोजी बोरी (म.) येथील महिला शेतकरी भागूबाई गव्हाणे यांनी जीवनयात्रा संपविली. ५ जुलै रोजी पारवा (खुर्द) येथील भावराव राठोड, ७ सप्टेंबर रोजी गहुलीचे खुशाल राठोड, २३ सप्टेंबरला वेणी (खुर्द) येथील प्रदीप कटारे व ५ आॅक्टोबर रोजी पारवा (खुर्द) येथील सदाशिव चव्हाण आदी शेतकऱ्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. शिवणी येथील महिला कास्तकार कमलाबाई जामकर यांनी १६ आॅक्टोबर रोजी विष प्राशन करून मृत्युला कवटाळले तर ३ नोव्हेंबरला शिवानगरच्या दिलीप जाधव यांनी गळफास लावून घेतला. कान्हा येथील गणपत ढंगारे यांनी १० डिसेंबर आत्महत्या केली. गत वर्षभरातील १२ पैकी चार शेतकरी आत्महत्या पात्र तर आठ आत्महत्या शासनाने अपात्र ठरविल्या आहेत. (प्रतिनिधी)