शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या शोधात १२०० कुटुंब परप्रांतात

By admin | Updated: February 6, 2017 00:19 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजुरांसाठी काम उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत असले तरी त्यांच्याच अखत्यारीतील

चार तालुके : शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहाने आले वास्तव पुढे रूपेश उत्तरवार   यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजुरांसाठी काम उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत असले तरी त्यांच्याच अखत्यारीतील शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहाने मजुरांच्या स्थलांतरणाचे बिंग फोडले आहे. पुसद आणि उमरखेड उपविभागातील चार तालुक्यातून तब्बल १२०० कुटुंब रोजगाराच्या शोधात परप्रांतात गेल्याचे वास्तव पुढे आले आहे. केंद्र सरकारने रोजगार हमी योजना कायदा लागू केला आहे. प्रत्येक नोंदणीकृत मजुराला किमान १०० दिवस काम देण्याचा हा कायदा आहे. परंतु आजही अनेकांना काम मिळत नाही. त्यामुळे मजूर गावालगतच्या शहराकडे धाव घेतात. परंतु पुसद, महागाव, उमरखेड आणि दिग्रस तालुक्यातील मजुरांनी शहरच नव्हे तर आपल्या प्रदेशाबाहेर कामासाठी धाव घेतल्याचे वास्तव पुढे आले आहे. शिक्षण विभागाच्यावतीने स्थलांतरित मजुरांच्या मुलासाठी हंगामी वसतिगृह चालविले जाते. या शाळांमध्ये नोंदणीकृत असलेल्या मुलांच्या संख्येवरून या चार तालुक्यातून तब्बल १२०० कुटुंब स्थलांतरित झाल्याचे दिसून येते. स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी असलेल्या या चार तालुक्यातील वसतिगृहात सध्या एक हजार ३४१ विद्यार्थी नोंदणीकृत आहे. त्यासाठी १२ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. हे हंगामी वसतिगृह शाळेच्या नियंत्रणात चालविले जातात. येथे नोंदणीकृत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक मात्र रोजगाराच्या शोधात बाहेर गेल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. ऊस तोड, विटभट्टी आणि इतर कामासाठी या मजुरांनी मुंबई, पुणे यासह गुजरातमधील सुरत, वापी, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील विविध शहरात धाव घेतली आहे. या चारही तालुक्यातील अनेक गावात घरांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते. तर काही घरात वृद्ध मंडळी तेवढी शिल्लक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे असताना मजुरांचे स्थलांतरण रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसत आहे.