ईश्वरचिठ्ठीने काढली सोडत : दहा जागा महिलांसाठी राखीव दारव्हा : चालू वर्षात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेचे प्रारुप वाचून दाखविणे आणि सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नगरपरिषद सभागृहात शनिवारी पार पडला. ईश्वरचिठ्ठीद्वारे आरक्षणाची सोडत काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोडतीच्या कार्यक्रमात सुरुवातीला मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी नवीन प्रभाग रचनेचे प्रारुप वाचून दाखविले. त्यानुसार एकूण १० प्रभाग राहणार असून प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून दिले जातील. प्रभाग रचनेच्या माहितीनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. पाच जागा नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि त्यामधील तीन जागा महिलांसाठी आरक्षित निघाल्या. दोन अनुसूचित जाती त्यामधील एक महिला, एक अनुसूचित जमाती महिला तर १२ जागा खुल्या प्रवर्गासाठी निघाल्या. त्यातील पाच ठिकाणी महिला आरक्षण राहील. प्रभाग क्र.१ मध्ये खुला, नामाप्र महिला, प्रभाग क्र. २ अनुसूचित जाती सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ३ अनुसूचित जमाती महिला, खुला. प्रभाग क्र. ४ अनुसूचित जाती महिला, खुला. प्रभाग क्र. ५ खुला, सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ६ नागरिकांचा मागासप्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ७ नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, खुला. प्रभाग क्र. ८ नागरिकांचा मागासप्रवर्ग सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ९ खुला, सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्र. १० सर्वसाधारण महिला व खुला या प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. प्रभागात समाविष्ट परिसर :- प्रभाग क्र. १- कारंजा नाका, रेल्वे स्टेशन परिसर, भाग्योदय कॉलनी. प्रभाग क्र. २ - पोस्ट आॅफीस, स्टेट बँक, नातूवाडी ते उपजिल्हा रुग्णालय, गजानन महाराज मंदिर परिसर, बसस्थानक, गोळीबार चौक, पोलीस स्टेशन. प्रभाग क्र. ३ - बसस्थानक, आर्णी रोडपासून शिवाजीनगर, बालाजीनगर, जिरापुरे नगर ते नेहा मंगल कार्यालय, कृषी कॉलनी, शिक्षक कॉलनी, कविता मंगल कार्यालय, कवितानगर. प्रभाग क्र. ४ - नारायण कॉम्प्लेक्स ते अंबिकानगर, पॉवर हाऊस, आर्णी रोडवरील उजवीकडील पूर्ण परिसर. प्रभाग क्र. ५ - वर्षा टॉकीज, प्रभात टॉकीज ते ओम जिनिंग, दत्तनगर, जुना दिग्रस रोड परिसर, लेंडी नाल्यापासून मस्जीद परिसर. प्रभाग क्र. ६ - कारंजा रोड दक्षिणेकडील भाग, शिवाजी शाळा, वन विभाग कार्यालय, अंबादेवी मंदिर परिसर, जैन मंदिर परिसर. प्रभाग क्र. ७ - राम मंदिर परिसर, दुर्गा चौक, हनुमान व्यायाम शाळा, जामा मशीद परिसर. प्रभाग क्र. ८ - कारंजा रोडच्या दक्षिणेकडील भाग, आप्पास्वामी मंदिर परिसर, कब्रस्थान, सवारी बंगला, श्रीकृष्णनगर परिसर. प्रभाग क्र. ९ - बंगला मशीद परिसर, भुरेखानगर, मल्लिाकार्जुन मंदिर, बाराभाई मोहोल्ला, उर्दू शाळा परिसर, प्रभाग क्र. १० - उर्दू शाळा क्र. ३ परिसर, किल्ला मशीद परिसर, पंचशीलनगर, बाजार समिती, मटन मार्केट, स्मशानभूमी परिसर.
दारव्हा येथे १२ जागा खुल्या प्रवर्गासाठी
By admin | Updated: July 3, 2016 02:29 IST