शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

१२ कुटुंबांच्या उपोषणाची दखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:12 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : अतिक्रमित जागेवर ३० वर्षांपासून राहणाऱ्या १२ मागासवर्गीय कुटुंबांची घरे प्रशासनाने बुलडोजरने पाडली. आता ही कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. मात्र, प्रशासनाने साधी भेट देण्याचे औचित्यही दाखविलेले नाही.पळसवाडी कॅम्प चपराशी क्वॉर्टर परिसरात हे झापडपट्टीधारक गेल्या ३० वर्षांपासून कच्ची घरे बांधून राहात आहेत. परंतु, १६ नोव्हेंबर ...

ठळक मुद्देपळसवाडीतील घरे पाडली : मुलाबाळांसह सहा दिवसांपासून उपोषण

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : अतिक्रमित जागेवर ३० वर्षांपासून राहणाऱ्या १२ मागासवर्गीय कुटुंबांची घरे प्रशासनाने बुलडोजरने पाडली. आता ही कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. मात्र, प्रशासनाने साधी भेट देण्याचे औचित्यही दाखविलेले नाही.पळसवाडी कॅम्प चपराशी क्वॉर्टर परिसरात हे झापडपट्टीधारक गेल्या ३० वर्षांपासून कच्ची घरे बांधून राहात आहेत. परंतु, १६ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वसूचना न देता ही घरे बुलडोजरने पाडली. त्यामुळे बेघर झालेल्या या कुटुंबापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. थंडीच्या दिवसात चिमुकल्या मुलाबाळांसह हे लोक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ५ डिसेंबरपासून उपोषणाला बसले.आम्हाला साधे पिण्यास पाणी नाही, शौचालय नाही, हाताला काम नाही अशा अवस्थेत आता राहते घरही गेल्याने आम्ही उघड्यावर आलो, अशी व्यथा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगरपरिषदेकडे घरकुलासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु, नगरपरिषदेने त्यावर अजूनही कार्यवाही केलेली नाही. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वप्रथम आमच्यासारख्या अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना घरे बांधून द्यावी, अशी मागणी या १२ कुटुंबांनी केली.दरम्यान, पालकमंत्र्यांना भेटण्यास गेल्यावरही त्यांनी भेट नाकारल्याचे गणेश भांडवले या उपोषणकर्त्याने सांगितले. गणेश भांडवले यांच्यासह कविता भांडवले, खुशाल मेश्राम, चैतन्या मेश्राम, शांताबाई गवळी, राजू गवळी, वैभव वासनिक, दीपमाला वासनिक, धर्मपाल उके, सरिता उके, ज्योती पोयाम, कमलाबाई लांजेवार, विरेंद्र लांजेवार, कविता लांजेवार, शेवंताबाई गेजीक, मंगला जायगुडे, दुर्गा गवळी, सुनिता वानखडे, संजय वानखडे, सुरज लोंढे, रोशनी लोंढे, विठाबाई ससाने, शंकर ससाने, संतोष ससाने, प्रदीप ससाने, शकुंतलाबाई ससाने, उत्तम डवरे, इंदूबाई डवरे, सुभाष मुनेश्वर, प्रजापती मुनेश्वर, जुबेदाबाई खान आदी उपोषणाला बसले आहेत.