शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

११ वी प्रवेश आॅफलाईन

By admin | Updated: June 18, 2017 00:49 IST

दहावीचा निकाल जाहीर होताच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

अ‍ॅडमिशनचे नो टेन्शन : ३१ हजार विद्यार्थी, ३६ हजार जागा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दहावीचा निकाल जाहीर होताच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात यंदाही आॅफलाईन पद्धतीनेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, दहावीत ३१ हजार ७२२ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असताना अकरावीकरिता जिल्ह्यात तब्बल ३६ हजार ४०० जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी यंदा ‘नो टेन्शन’ची स्थिती आहे. १३ जून रोजी दहावीचा निकाल संकेतस्थळावर घोषित होताच अकरावी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात दहावीचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना मिळाल्यावर म्हणजे, २४ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. प्रत्यक्षात २४ रोजी चौथा शनिवार, २५ रोजी रविवार आणि २६ रोजी रमजान ईदची सुटी आल्याने प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून खऱ्या अर्थाने सुरू होईल. विशेष म्हणजे, ही प्रवेश प्रक्रिया स्थानिक शाळा-महाविद्यालयस्तरावरच होईल. जेथे माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग जोडले आहेत, तेथे अकरावीसाठी ८० इतकी प्रवेश क्षमता मंजूर आहे. तर जेथे स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय आहे, तेथे १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक वर्ग महाविद्यालयांना जोडलेले आहेत, तेथेही अकराव्या वर्गात १२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता शिक्षण विभागाने मंजूर केली आहे. जिल्ह्यात अकरावीकरिता ४५५ तुकड्यांना मान्यता असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देऊ नये, अशा शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या सूचना आहेत. बारावीच्या प्रवेशाकरिताही हीच क्षमता मंजूर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या उपलब्ध जागा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. परंतु, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता एखाद्या विशिष्ट शाखेकरिता गर्दी होण्याचीही शक्यता आहे. तसेच गावातील उपलब्ध महाविद्यालयांपैकी एखाद्या विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश घेण्यासाठीही अर्जांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश द्यावे लागणार आहे. विनाकारण आंदोलन केल्यास कारवाईचे निर्देश शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाचे पथक प्रवेशासाठी वणीत गेल्या वर्षी वणीतील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत अकरावी प्रवेश मिळू शकला नव्हता. या विद्यार्थ्यांनी यवतमाळात येऊन वारंवार आंदोलनेही केली होती. वणीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण बघता यंदाही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकमेव वणीमध्ये अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाचे पथक एलटी महाविद्यालयात दाखल होईल. तेथेच सर्व अर्ज स्वीकारून तेथूनच वणीतील चारही महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.