शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

११२७ सिंचन विहिरींच्या कामाला सुरुवातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 01:05 IST

विदर्भ सिंचन विहिरी योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या तब्बल ११२७ धडक सिंचन विहिरींच्या कामाला अद्याप सुरूवातच झाली नाही.

मुदत संपली : शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न भंगले, मजूर नसल्याचे कारण लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विदर्भ सिंचन विहिरी योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या तब्बल ११२७ धडक सिंचन विहिरींच्या कामाला अद्याप सुरूवातच झाली नाही. आता खोदकाम व बांधकामाची मुदत संपल्याने या विहिरी पूर्ण होणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने विदर्भ सिंचन विहिरी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरी बांधून देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेमार्फत १२ हजार ९९७ शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरी मंजूर झाल्या. मात्र विविध कारणांनी या विहिरींचे काम रखडले. कधी निधी नाही, तर कधी मजूर मिळत नसल्याची लंगडी सबब त्यासाठी पुढे केली गेली. परिणामी तब्बल ११२७ विहिरींचे खोदकाम अद्याप सुरूच झाले नाही. आता ३० जूनला मुदत संपल्याने या विहिरी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न कोमेजले आहे. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून आत्तापर्यंत दहा हजार विहिरी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. मात्र त्यातही अनेक ठिकाणी किरकोळ कामे बाकी आहेत. अनेक शेतकऱ्यांना निधीही मिळाला नाही. सध्या दोन हजार ७८४ विहिरींचे खोदकाम, बांधकाम अपूर्णच आहे. जिल्ह्यात आजमितीस केवळ एक हजार ३८५ विहिरींचे खोदकाम, बांधकाम सुरू आहे. मात्र पावसाळ्यामुळे त्यातही बाधा निर्माण झाली आहे. दोनदा मिळाली मुदतवाढ धडक सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या ३० जून २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तत्पूर्वी एकदा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. सतत दोनदा मुदतवाढ देऊनही या विहिरी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा पुढील ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या मागणीचे पत्र शासनाला पाठविले.