बैठकीला गैरहजर : निवडणुकीसारख्या विषयात केली हयगय महागाव : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक तयारीसाठी आयोजित बैठकीला गैरहजर असलेल्या ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना उमरखेड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी शोकॉज नोटीस बजावली आहे. यात फुलसावंगी येथील पोलीस पाटलांचाही समावेश आहे. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी २९ डिसेंबर रोजी महागाव येथे सभा घेतली. या सभेला गैरहजर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली. त्यात धारमोहा, अनंतवाडी, माळकिन्ही, वागद येथील तलाठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी, सवना शाखेचे सिंचन उपअभियंता, महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वीज वितरणचे उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी, सहाय्यक उपनिबंधक आणि फुलसावंगी येथील पोलीस पाटलाचा समावेश आहे. निवडणुकीसारख्या संवेदनशील विषयात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकत मिळत आहेत. तहसीलदारांनी बजावलेल्या नोटीसला संबंधितांनी उत्तर दिले. एसडीओंकडून या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे संकेत मिळत आहे. विशेष म्हणजे तत्कालिन एसडीओ दीपक सिंगला यांनी महागाव येथील सार्वजनिक बांधकामच्या तीन शाखा अभियंत्यांविरुद्ध निवडणुकीच्या कामात हयगय केल्याने गुन्हा दाखल केला होता. (शहर प्रतिनिधी)
एसडीओंची ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीस
By admin | Updated: January 6, 2017 02:02 IST