शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पालकमंत्र्यांसह ११ जण निर्दोष मुक्त

By admin | Updated: June 19, 2016 02:17 IST

काँग्रेस कमिटीचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक आणि चालकास मारहाण प्रकरणी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह ११ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

नेर न्यायालय : प्रदेशाध्यक्षांच्या वाहनांवर दगडफेकप्रकरणनेर : काँग्रेस कमिटीचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक आणि चालकास मारहाण प्रकरणी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह ११ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संदीप सरोदे यांनी हा निर्णय दिला आहे. सन २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत वटफळी गटातून राहुल माणिकराव ठाकरे रिंगणात होते. त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेस कमिटीचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, तत्कालिन पालकमंत्री नितीन राऊत दाखल झाले होते. आचारसंहिता भंग करून प्रचार केल्याचा आरोप करत त्यांच्या वाहनावर दगडफेक करून चालक मधुकर राठोड याला मारहाण केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पालकमंत्री संजय राठोड, नितीन माकोडे, भाऊराव ढवळे, संजय दारव्हटकर, स्रेहल भाकरे, राजेश ढोकणे, खुशाल मिसाळ, प्रशांत मासाळ, प्रमोद राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण पोलिसांनी न्यायप्रविष्ठ केले. चार वर्ष चार महिने या प्रकरणाचा खटला चालला. २२ साक्षी तपासण्यात आल्या. दोन्ही बाजुच्या युक्तीवादाअंती न्यायालयाने ना. संजय राठोड यांच्यासह ११ जणांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात ना. राठोड यांच्यावतीने अ‍ॅड़ रमेश जुनघरे यांनी बाजू मांडली. (तालुका प्रतिनिधी)