शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘मोनसॅन्टो’ला ११ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:50 IST

कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोकला आहे.

ठळक मुद्देग्राहक न्यायालय : पाच शेतकऱ्यांना भरपाईचा आदेश
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोकला आहे.कृष्णराव देशट्टीवार (पांढरकवडा), विलास देशट्टीवार व दीपक राठोड (वाघोली), उत्तम झिपा चव्हाण (वसंतनगर) आणि गणेश जाधव (चोपण ता. केळापूर) या शेतकऱ्यांनी ‘मोनसॅन्टो’ कंपनीचे बियाणे खरेदी करून शेतात टोबले. उगवण चांगली झाली. पीक वाढून फुलावर असताना कपाशीची झाडे वाळू लागली. ही बाब सदर शेतकऱ्यांनी पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि गठित समितीने या शेतकऱ्यांच्या पऱ्हाटीची पाहणी केली. अजैविक पान असल्याने कपाशीचे पीक वाळून या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट नमुद करण्यात आले.कृषी विभागाच्या अहवालानंतर या शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र टाळाटाळ सुरू केल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. बियाण्यांमध्ये अजैविक ताण सहन करण्याची शक्ती नाही म्हणजेच बियाणे सदोष आहे, या निर्णयाप्रत मंच पोहोचले. झालेल्या नुकसानीपोटी कंपनीने विकास देशट्टीवार यांना पाच लाख २० हजार, विलास देशट्टीवार यांना ९० हजार, दीपक राठोड ३६ हजार, उत्तम चव्हाण ६८ हजार आणि गणेश जाधव यांना तीन लाख ९६ हजार रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मंचाने दिला आहे. सदर शेतकऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास तसेच तक्रार खर्चापोटी रक्कम द्यावी, असा निर्णय मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे, सुहास आळशी यांनी दिला आहे.५५ न्यायनिवाडे दाखल‘मोनसॅन्टो’ कंपनीने लेखी युक्तीवादासोबत ५५ व इतर वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले होते. याचे बारकाईने अवलोकन केले असता त्यातील परिस्थिती आणि सदर पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या प्रकरणातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे सदर न्यायनिवाडे याप्रकरणाला लागू होत नाही, असे मंचाने निकालपत्रात म्हटले आहे.