शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विना नोंदणीच्या १०७ दुचाकी रस्त्यावर

By admin | Updated: May 23, 2017 01:17 IST

कोणतेही वाहन परिवहन विभागाच्या नोंदणीशिवाय रस्त्यावर आणणे गुन्हा आहे.

बीएस-३ प्रकरण : ‘उलाढाली’नंतर नोंदणी प्रक्रिया सुरू सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोणतेही वाहन परिवहन विभागाच्या नोंदणीशिवाय रस्त्यावर आणणे गुन्हा आहे. परंतु यवतमाळात एक-दोन नव्हे तब्बल १०७ दुचाकी दीड महिना विना नोंदणीच्या रस्त्यावर धावत होत्या. बीएस-३ इंजिनच्या बंदी असलेल्या या दुचाकी मुदतीत नोंदणीकृत झाल्या नाही. मात्र आतापर्यंत रस्त्यावर धाव होत्या. आता मोठ्या ‘उलाढाली’नंतर आरटीओत या दुचाकींची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांवर बंदी घातली आहे. मात्र अशा वाहनांची नोंदणी ३१ मार्चपूर्वी करण्याची मुदत दिली होती. बंदी असलेली ही वाहने विकण्यासाठी कंपन्यांनी घसघसीत सूट दिली. खरेदीसाठी गर्दी आणि आरटीओ कार्यालयात नोंदणीसाठी रांगा लागल्या. या धावपळीत यवतमाळात अनेकांनी गुंतवणूक म्हणून १०७ दुचाकी खरेदी केल्या. परंतु यवतमाळ परिवहन विभागाने आॅनलाईन इन्शुरन्सची प्रत नसल्याने या वाहनांची नोंदणी करण्यास स्पष्ट नकार दिला. परंतु या दुचाकी रस्त्यावर नोंदणीशिवाय फिरत आहे. घसघसीत सूट मिळालेल्या विनानंबर प्लेटच्या वाहनांवर दीड महिन्यात पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. विशेष म्हणजे नोंदणी नसलेली वाहने रस्त्यावर चालविणे गुन्हा आहे. शो-रूम चालकाने ही वाहने नोंदणी होईपर्यंत आपल्या ताब्यात ठेवणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. स्वस्तातील वाहने मोठ्या संख्येत गुंतवणूक म्हणून खरेदी करण्यात आली. आता ती नोंदणी करून जादा दराने विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे.बीएस-३ तंत्राच्या या दुचाकींची मुदतीनंतर नोंदणीसाठी शोरूम चालकाने थेट परिवहन आयुक्तांकडे अपिल दाखल केले. या अपिलावर ३ मेपर्यंत निर्णयच लागला नाही. मोठ्या ‘उलाढाली’नंतर नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत प्रभारी डेप्युटी आरटीओ विजय काठोळे यांनी वरिष्ठांच्या निर्देशावरुनच बीएस-३ वाहनांची नोंदणी करीत असल्याचे सांगितले. मात्र दीड महिना कुणाच्या आदेशावरुन ही वाहने रस्त्यावर धावत होती, असे विचारताच त्यांनी हातवर केले. अपिलाची प्रकरणे माझ्याकडे येत नाहीत, त्यामुळे नेमकी माहिती आता सांगता येणार नाही. - सतीश सहस्त्रबुद्धेप्रभारी, आयुक्त (परिवहन) मुंबई.