शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

१०३ उमेदवारांचा फैसला

By admin | Updated: October 18, 2014 23:00 IST

जिल्ह्यातील विधानसभेच्या सात जागांसाठी १०३ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला रविवारी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून सातही मतदारसंघात मतमोजणीला

सात मतदारसंघ : ८ वाजतापासून मतमोजणी, १२ पर्यंत निकालयवतमाळ : जिल्ह्यातील विधानसभेच्या सात जागांसाठी १०३ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला रविवारी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून सातही मतदारसंघात मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. सात विधानसभा मतदारसंघासाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सरासरी ६६ टक्के मतदान झाले. शिवाजीराव मोघे, मनोहरराव नाईक, वसंत पुरके, संदीप बाजोरिया, संजय राठोड, वामनराव कासावार, विजय खडसे, मदन येरावार, प्रकाश पाटील देवसरकर, विश्वास नांदेकर, संदीप धुर्वे आदी आजी-माजी आमदारांसह १०३ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले होते. या भाग्याचा फैसला रविवारी होतो आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी धामणगाव रोड स्थित निवासी महिला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होत आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक व्यूहरचना तयार केली आहे. यवतमाळचा नवा आमदार हा काँग्रेसचा होणार, भाजपाचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा की बहुजन समाज पार्टीचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा, शिवसेना आणि बसपा उमेदवार व समर्थकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास पहायला मिळत आहे. त्यांनी विजयाच्या जल्लोषाची तयारीही केल्याचे सांगितले जाते. १५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी मतदान घेण्यात आले होते. मतदानाची पक्रिया आटोपल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्रॉंगरूममध्ये मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहे. या मतपेट्या १९ आॅक्टोबर रोजी उघडल्या जातील. यवतमाळसाठी मतमोजणीचे एकूण २० राऊंड होणार असून प्रत्येक राऊंडमध्ये २० टेबल म्हणजे २० मशिनची मोजणी होईल. वणी मतदारसंघासाठी मतमोजणी वणी येथे शासकीय धान्य गोदामातील दोन नंबरच्या हॉलमध्ये होणार आहे. या मतदारसंघात मजमोजणीचे २३ राऊंड होणार असून प्रत्येक राऊंडमध्ये १४ मशिन राहतील. राळेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोडाऊन वडकी रोड, हॉल नंबर दोन येथे होईल. या मतदारसंघासाठी मतमोजणी २५ राऊंड व प्रत्येक राऊंडमध्ये १४ टेबल या प्रमाणे होईल.दिग्रस येथे नेर रोडला शासकीय धान्य गोदाम हॉल नंबर दोनला मतमोजणी होईल. एकूण २५ राऊंड होणार असून येथेही प्रत्येक राऊंडला १५ मशिन ठेवल्या जातील. आर्णी मतदारसंघासाठी शहीद नागेश्वर जिड्डेवार भवन पांढरकवडा येथे मतमोजणी होणार असून येथेही १५ राऊंड व प्रती राऊंड १४ मशिन राहतील. पुसद मतदारसंघासाठी तालुका क्रीडा संकुलात मजमोजणी होईल. तेथे २२ राऊंड होणार असून प्रत्येक राऊंडमध्ये १४ मशिन राहतील. उमरखेडसाठी तहसील कार्यालय परिसरातील धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे. २३ राऊंड होणार असून प्रत्येक राऊंडमध्ये १४ टेबल राहणार आहे. (शहर वार्ताहर)