शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या धोनी क्रिकेट अकादमीत १०० खेळाडूंना मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:08 IST

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नागपूर येथे भारतातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे. यात विदर्भातील (नागपूर वगळता) १०० खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

ठळक मुद्दे भारतातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नागपूर येथे भारतातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे. यात विदर्भातील (नागपूर वगळता) १०० खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. यासाठी २५ व २६ आॅगस्ट रोजी येथील बालाजी स्पोर्टस अकादमीवर नि:शुल्क निवड चाचणी होत आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.एसजीआर स्पोर्टस अकादमी नागपूर आणि अर्का स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमीची स्थापना डोंगरगाव (नागपूर) येथे करण्यात आली आहे. क्रिकेट क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंचा गुणात्मक विकास व्हावा, विदर्भातील क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, राष्ट्रीय पातळीवर वैदर्भीय खेळाडू यावेत या उद्देशाने ही अकादमी स्थापन करण्यात आली आहे. नागपूर वगळता विदर्भाच्या इतर जिल्ह्यातील खेळाडूंना अकादमीत विनाशुल्क प्रवेश मिळणार आहे.खेळाडूंना अत्याधुनिक बॉलिंग मशिन्स व इतर क्रीडा उपकरणाद्वारे बीसीसीआयच्या तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात महिंद्रसिंग धोनी हे या क्रिकेट अकादमीचे औपचारिक उद्घाटन करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.यवतमाळ येथे निवड चाचणीत ६ वर्षावरील खेळाडू सहभागी होऊ शकतात. यासाठी नोंदणी बालाजी स्पोर्टस अकादमीचे राजन भुरे यांच्याकडे करता येईल, असे यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला एसजीआर स्पोर्टसचे अध्यक्ष मंगेश राऊत, लवलेश राऊत, राजन भुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :M. S. Dhoniएम. एस. धोनी