शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत ग्रामीण शाळांची बाजी

By admin | Updated: June 14, 2017 00:17 IST

राळेगाव तालुक्याचा दहावीचा निकाल ६७.२७ टक्के लागला आहे. परिक्षेस बसलेल्या एक हजार ४४३ विद्यार्थ्यांपैकी ९६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

अनेक शाळा बाँड्रीवर पास : राळेगाव व घाटंजी तालुक्यात विद्यार्थिनी अव्वल लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव ६७ टक्के राळेगाव : राळेगाव तालुक्याचा दहावीचा निकाल ६७.२७ टक्के लागला आहे. परिक्षेस बसलेल्या एक हजार ४४३ विद्यार्थ्यांपैकी ९६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह यश मिळविले. २४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील शाळांचा निकाल असा आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव ७४.५८ टक्के, नेताजी विद्यालय राळेगाव ५९.०९, संस्कृती संवर्धन कन्या शाळा राळेगाव ६७.५६, महावीर कॉन्व्हेंट राळेगाव १०० टक्के, लोकविद्यालय खैरी ७५.२९, लखाजी महाराज विद्यालय झाडगाव ७९.८०, यशवंत विद्यालय खैरी ५८.३३, जिल्हा परिषद हायस्कूल वाढोणाबाजार ६६.१० टक्के, जिल्हा परिषद हायस्कूल वडकी ६६.२५, पोस्ट बेसिक आश्रमशाळा किन्ही(ज) ८६.८६, गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव ७५.३८, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय धानोरा ६४.२८, माध्यमिक कन्या विद्यालय वडकी ४७.५०, रेणुकाबाई देशमुख विद्यालय दहेगाव ५२.९४, सोनामाता हायस्कूल चहांद ५८.३३, बापूसाहेब देशमुख विद्यालय जळका ८० टक्के, बोधिसत्व विद्यालय सराटी ६२.९६, शांतादेवी कोळसे विद्यालय सावरखेडा ९०, गुरुदेव विद्या मंदिर वरध ८० टक्के, पौर्णिमा माध्यमिक विद्यालय सावनेर ३८.०९, वसंत सेकंडरी स्कूल एकुर्ली ४ टक्के, सर्वोदय विद्यालय रिधोरा ३८.४६ टक्के, पोस्ट बेसिक आश्रमशाळा सावरखेडा ९३.८७, प्रतिभा आश्रमशाळा जळका ७२.४, माध्यमिक विद्यालय वाटखेड ४१, रामचंद्र महाराज आश्रमशाळा खैरगाव(का) ८०.४८, महात्मा फुले विद्यालय वाढोणाबाजार ६१.७६, राजर्षी शाहू महाराज विद्यालय गुजरी २५.९२, स्मॉल वंडर कॉन्व्हेंट वडकी १०० टक्के. घाटंजीचा निकाल ७९ टक्के घाटंजी : तालुक्याचा दहावीचा निकाल ७९.४२ टक्के लागला. यात एसपीएम इंग्लिश मीडियम शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतून परीक्षेस बसलेले सर्व १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातून दोन हजार ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात एक हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील शाळांचा निकाल असा आहे. एसपीएम विद्यालय घाटंजी ७९.७४, समर्थ विद्यालय घाटंजी ८३.०२, एसपीएम कन्या शाळा घाटंजी ७९.०९, बा.दे. विद्यालय पारवा ७७.५४, वसंत आदिवासी विद्यालय पार्डी ९२.१५, बा.दे. विद्यालय शिरोली ७४.७, शासकीय आश्रमशाळा झटाळा ८२.१४, जगदंबा विद्यालय सायतखर्डा ९५.२३, शासकीय आश्रमशाळा जांब ८६.५३, मंजी नाईक विद्यालय ९०.४१, नगरपरिषद उर्दू विद्यालय ८४, बा.दे. विद्यालय कुर्ली ७३.५२, विवेकानंद विद्यालय पांढुर्णा(खु) ८६.६६, महात्मा जोतिबा फुले विद्यालय एरणगाव ८०.६४, माधवराव नाईक विद्यालय शिवणी ६१.८१, आर.सी. उपलेंचवार विद्यालय आमडी ८१.६३, के.जी. सिद्धू विद्यालय राजुरवाडी ७३.७७, प्रेमसिंग राठोड विद्यालय मोवाडा ७१.९२, बा.दे. विद्यालय साखरा ८४.५, के.जी. सिद्धू विद्यालय सावरगाव(मंगी) ७४.१९, गुरुदेव आदिवासी आश्रमशाळा चांदापूर ५५.३१, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी विद्यालय घोटी ८०.२१, आदर्श माध्यमिक विद्यालय ताडसावळी ८४.३७, ए. मज्जीद पटेल उर्दू विद्यालय चिखलवर्धा ७९.१६, शासकीय आश्रमशाळा कारेगाव ६८, ए.डी. पारवेकर आश्रमशाळा जरूर ७७.५५, जिजाऊ आश्रमशाळा खापरी ३३.३३, शासकीय आश्रमशाळा मोवाडा ७२, शासकीय आश्रमशाळा रामपूर ८९.४७, दत्त माध्यमिक विद्यालय अंजी(नृ) ८३.८७, गजानन महाराज माध्यमिक विद्यालय कोळी ९५.२३, गजानन महाराज आश्रमशाळा तिवसाळा ९०.७४. कळंबचा निकाल ६६ टक्के कळंब : दहावीच्या परीक्षेचा कळंब तालुक्याचा निकाल ६६ टक्के लागला आहे. २७ शाळांमधून एक हजार ७३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७६ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे. २९९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर द्वितीय श्रेणीत ५५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २०६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. कळंब येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचा तालुक्यात सर्वाधिक ८९.६५ टक्के निकाल लागला. पोटगव्हाण येथील संत गाडगेबाबा विद्यालयाचा तालुक्यात सर्वात कमी निकाल लागला. दहावीच्या निकालात दारव्हा शहर माघारले दारव्हा : तालुक्यात दहावीच्या परीक्षेला बसलेले दोन हजार ६७७ पैकी दोन हजार १६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल ८१.१३ टक्के लागला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तीर्णतेच्या टक्केवारीत शहरातील हायस्कूल माघारले, तर ग्रामीण भागातील शाळांनी मात्र बाजी मारली आहे. १०० टक्के निकाल देणाऱ्या दोनही शाळा ग्रामीण भागातील आहेत. माणिकराव ठाकरे उर्दू हायस्कूल पळशी व बाबा अरब साहाब उर्दू हायस्कूल बोरी या दोनही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. डॉ. आलम इकबाल उर्दू हायस्कूल लाडखेड ९६.९६ टक्के, मुंगसाजी बाबा विद्यालय धामणगाव ९६.७७, नॅशनल उर्दू हायस्कूल महागाव(क) ९५.२३, शहीद भगतसिंग विद्यालय महागाव(क) ९४.५२, मनोहर नाईक उर्दू हायस्कूल दारव्हा ९३.७५, सुभाषचंद्र बोस हायस्कूल रामगाव ९२.१०, भुराजी महाराज महाविद्यालय महातोली ९२, बीबी फातिमा उर्दू गर्ल हायस्कूल दारव्हा ९९.९०, विवेकानंद विद्यालय बोदेगाव ९०.८१, शंकरराव राठोड विद्यालय देऊळगाव ९०.२४, मिल्लत इंग्लिश हायस्कूल दारव्हा ९०, प्रताप हायस्कूल तळेगाव ९५ टक्के, तर लिटील बर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूलचा निकाल ९६ टक्के लागला आहे. येथील एडेड हायस्कूलचा प्रथमेश संजय निमकर ९५.८०, लाभेश कृष्णा निमकर ९५.४०, यश दातीर ९३.५०, ओंकार व्यवहारे ९३, यश ठाकरे ९२.६०, आशुतोष घाटे ९२.४०, प्रज्ज्वल दुधे ९२.४०, चिराग भुजाडे ९०.६०, आर्यन पत्रे ९० आणि प्रतीक लोहकरे याला ८९.८० टक्के गुण मिळाले आहे.