यवतमाळ : भरधाव कंटेनरने टाटा मॅजीक या प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामध्ये प्रवासी वाहनाची मोडतोड होऊन १० जण गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास येथील पांढरकवडा बायपास मार्गावरील चौफुलीवर घडली. मोहन राठोड, कमलाबाई पवार, रोशन हेमोल, आशाबाई उईके, मनोहर चंदूजी वाढई, विजय अनिल राठोड, सोनाली निखाडे, शे. ताहेर शे. नदीम, सूरज राऊत, झलाबाई तडसे अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. घटनेनंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रवासी वाहन (एम.एच-२९-टी-८३६४) यवतमाळ येथून पांढरकवडाकडे जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर (एमएच ३१ सीजी ४५०५) ने त्याला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. यावेळी त्यांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (स्थानिक प्रतिनिधी)
कंटेनरच्या धडकेत १० प्रवासी जखमी
By admin | Updated: December 13, 2014 02:25 IST