शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

१० लाखांचे बियाणे बाजोरियानगरातून लंपास

By admin | Updated: June 11, 2016 02:45 IST

पेरणीची लगबग सुरू झाल्याने बियाण्याचे गोदाम चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहे. शहरातील बाजोरियानगरात गोदामाचे शटर वाकवून

गोदामाचे शटर तोडले : लोहारा चौकात सापडला पाच लाखांचा मालयवतमाळ : पेरणीची लगबग सुरू झाल्याने बियाण्याचे गोदाम चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहे. शहरातील बाजोरियानगरात गोदामाचे शटर वाकवून चोरट्यांनी तब्बल १० लाख रूपयांचे बियाणे लंपास केले. ही घटना गुरूवारी रात्री घडली. दरम्यान त्याच वेळेस लोहारा चौकात संशयास्पद स्थितीत असलेल्या व्हॅनमध्ये पाच लाखांचे बियाणे सापडले. साईनाथ यादवराव मोतेवार रा. वासवीनगर, आर्णी रोड यांचे बाजोरियानगरात बियाण्याचे गोदाम आहे. मोतेवार हे कृषीकेंद्र मालाचे ठोक व्यापारी आहे. ते शुक्रवारी सकाळी गोदाम उघडण्यासाठी आले असता त्यांना शटर वाकवलेले दिसले. घटनास्थळावर लोखंडी रॉड पडून होता. त्यांनी मालाची तपासणी केली असता. सोयाबीन आणि कापसाच्या विविध वाणांचे बियाणे चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल केला. दरम्यान रात्री २.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि लोहारा ठाण्यातील गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्याला लोहारा चौकात एक व्हॅन संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांचे वाहन दिसताच या व्हॅनमधून बाहेर पडून तिघांनी पळ काढला. संशय बळावल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र जनावर चोरीतील आरोपीसोबत असल्याने नाईलाज झाला. व्हॅनची झडती घेतली असता त्यामध्ये पाच लाखांचे बियाणे आढळून आले. निळ्या रंगाची व्हॅन (क्रमांक एमएच १४-९४०४) पोलिसांनी ताब्यात घेतली. शिवाय कापूस बियाणेसुद्धा जप्त करण्यात आले. सापडलेले बियाणे बाजोरियानगरच्या गोदामातील आहे काय, याची पडताळणी पोलीस करत आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी चोरीच्या बियाण्याची पहिली ट्रीप कुठेतरी रिकामी केली. त्यानंतर दुसरी ट्रीप घेऊन जात असताना त्यांची व्हॅन लोहारा चौकात फेल पडली. त्यामुळे चोरट्यांना माल सोडून पळ काढावा लागला. (कार्यालय प्रतिनिधी)