शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

१० लाखांची धाडसी घरफोडी

By admin | Updated: July 27, 2015 01:14 IST

शहरातील सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुबन कॉलनीत धाडसी घरफोडी होऊन

मधुबन कॉलनीतील घटना : ३५६ ग्रॅम सोन्यासह रोख लंपास यवतमाळ : शहरातील सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुबन कॉलनीत धाडसी घरफोडी होऊन चोरट्यांनी तब्बल दहा लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री १० च्या दरम्यान घडली. येथील धामणगाव मार्गावरील मधुबन कॉलनीत जयकिसन धूत यांचे घर आहे. शनिवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे मेनलाईन स्थित आपल्या दुकानात गेले होते. तर पत्नी बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हात साफ केला. लगतच्या मोकळ्या मैदानातून थेट वॉलकंपाऊंडवरून घराच्या आवारात चोरट्यांनी प्रवेश केला. मुख्यदाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील तळ मजल्यातील दोन कपाट आणि वरच्या मजल्यातील दोन कपाट या चोरट्यांनी फोडले. कपाटातून ३६५ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, डायमंड ज्वेलरी, रोख एक लाख पाच हजार असा ऐवज लंपास केला. रात्री १० वाजता जयकिसन धूत आपल्या घरी परतले तेव्हा दाराचे कुलूप तुटलेले आढळले. दार उघडण्याचा प्रयत्न केला असता ते आतून बंद होते. संशय बळावल्याने त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. चोरटे घरामागून शिरले आणि तेथूनच पसार झाल्याचा संशय आहे. या घटनेची माहिती यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मधुबन कॉलनी ही शहरातील सर्वात सुरक्षित कॉलनी म्हणून ओळखली जाते. या कॉलनीला चारही बाजूला सुरक्षा भिंत असून एकच प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर २४ तास चौकीदार तैनात असतो. अशा स्थितीतही चोरट्याने या कॉलनीत शिरुन तेही सायंकाळच्या सुमारास चोरी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील घरफोडीचा अजूनही उलगडा झालेला नसतानाच चोरट्यांनी आणखी एक आव्हान पोलिसांपुढे उभे केले आहे. शहरात दररोज कुठे ना कुठे घरफोडी होत असून पोलीस मात्र चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरले आहे. रविवारी सायंकाळी धूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)