शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या वसंत प्रतिष्ठानचे दहा कोटींचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:34 IST

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुसदमध्ये सुरू करण्यात आलेले दहा कोटींच्या वसंत प्रतिष्ठानचे काम आज चार वर्षानंतरही अर्धवट स्थितीत आहे. उलट या कामात तब्बल ८० लाख रुपयांची नियमबाह्यरीत्या अतिरिक्त देयके काढण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नव्या अधीक्षक अभियंत्यांना ‘कन्व्हेन्स’ करण्याचा प्रयत्न होणार आहे.

ठळक मुद्देचार वर्षे लोटली : ८० लाखांची अतिरिक्त देयके वांद्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुसदमध्ये सुरू करण्यात आलेले दहा कोटींच्या वसंत प्रतिष्ठानचे काम आज चार वर्षानंतरही अर्धवट स्थितीत आहे. उलट या कामात तब्बल ८० लाख रुपयांची नियमबाह्यरीत्या अतिरिक्त देयके काढण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नव्या अधीक्षक अभियंत्यांना ‘कन्व्हेन्स’ करण्याचा प्रयत्न होणार आहे.काँग्रेस आघाडी सरकारमध्ये ३१ जुलै २०१३ ला वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातील दहा कोटी रुपयातून पुसदच्या सूतगिरणीच्या जागेत वसंत प्रतिष्ठानची इमारत तर दोन कोटी रुपये नाईकांच्या गहूली या गावात स्मारकासाठी देण्याचे निश्चित झाले. दहा कोटीतून काही रक्कम जागेच्या खरेदीसाठी खर्च झाली. उर्वरित इमारतीच्या कामासाठी सहा करार करण्यात आले. परंतु आज चार वर्षे लोटूनही हे काम पूर्ण झाले नाही. कॉलम, बिम, फॅब्रिकेशन, काँक्रिटीकरण यात नियमाबाहेर जावून सुमारे ८० लाखांची अतिरिक्त देयके तयार केली गेली. बहुतांश पेमेंटही दिले गेले. कामाच्या अंतिम मोजमापनंतर हा प्रकार उघडकीस आला. या ८० लाखांच्या अतिरिक्त देयकांच्या मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता चामलवार यांची स्वाक्षरी लागणार आहे. ही स्वाक्षरी मिळविण्यासाठी संबंधित अभियंता व मूळ कंत्राटदारांकडून व्यूहरचना केली जात आहे.८० लाखांच्या या अतिरिक्त देयकासाठी पुसदचे तत्कालिन शाखा अभियंता जुगल जाधव यांना जबाबदार मानले जात आहे. आपल्याच अधिकारात असल्याने त्यांनी सर्रास वाटेल तेवढी व वाटेल तेव्हा देयके मंजूर केली. उपरोक्त कामे साडेचार व सात टक्के कमी दराने मंजूर झाली आहे. यातून शासनाचे वाचणारे सुमारे ७० ते ८० लाख रुपये या अतिरिक्त कामांच्या रूपाने वळते करण्याचा अभियंता व कंत्राटदाराचा प्रयत्न असावा, असे दिसते. या अतिरिक्त देयकांबाबत सुरुवातीला दिग्रसच्या उपअभियंत्याकडून मोजमाप करून घेतले असता तीन लाखांची अतिरिक्त कामे आढळून आली होती. मात्र त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही व ही देयके आता ८० लाखांवर पोहोचली आहे. या देयकांच्या मंजुरीसाठी दोन वर्षांपासून अधीक्षक अभियंत्याकडे पत्रव्यवहार केला गेला. मात्र ही देयके नेमकी कशी वाढली, हे सांगू शकत नसल्याने अभियंत्याने त्याचा पाठपुरावा केला नाही. त्यातून मध्यम मार्ग म्हणून वसंत प्रतिष्ठानच्या इमारतीमधील लिफ्ट रद्द करण्यात आली आहे.विशेष असे, या प्रतिष्ठानच्या वॉलकंपाऊंडचा पैसाही इमारतीत वापरला गेला. कंपाऊंड नसल्याने तेथे साडेतीन लाख रुपये खर्चून लावण्यात आलेले लॉन व्यर्थ ठरले आहे. त्यावर गाजर गवत निघाले आहे. कंपाऊंडअभावी ही इमारत दारुडे, प्रेमीयुगुल व टवाळखोरांचे आश्रयस्थान बनले आहे.अभियंत्याने मिळविला उमरखेडचा अतिरिक्त प्रभारगेली कित्येक वर्षे पुसदमध्येच ठाण मांडून असलेल्या व वसंत प्रतिष्ठानमधील ८८ लाखांच्या अतिरिक्त देयकाने चर्चेत आलेल्या शाखा अभियंता जुगल जाधव यांनी दीड महिन्यांपूर्वी राजकीय आशीर्वादाने उमरखेडच्या उपअभियंत्याचा अतिरिक्त प्रभार मिळविण्यात यश मिळविले आहे. या अभियंत्याची रस्त्यांच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीची (एएमसी) सहा कामे, पुसद-शेंबाळपिंपरी मार्गातील पॅचेसची कामेही चर्चेत आहेत. कामे न करणे, लांबी-रुंदी कमी करणे, परस्पर देयक मंजूर करणे असे प्रकारही या अभियंत्याबाबत सांगितले जात आहे.