शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

एसटी-दुचाकी अपघातात १ ठार, १७ जण जखमी

By admin | Updated: May 12, 2016 02:38 IST

समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस झाडावर जाऊन आदळल्याने दुचाकीस्वार ठार तर बसमधील वाहकासह १७ प्रवासी जखमी झाले.

थाळेगावची घटना : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला अपघातबाभूळगाव : समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस झाडावर जाऊन आदळल्याने दुचाकीस्वार ठार तर बसमधील वाहकासह १७ प्रवासी जखमी झाले. ही घटना यवतमाळ-धामणगाव मार्गावरील थाळेगाव फाट्याजवळ बुधवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दीपक माधव सुकटे (३०) रा. खापरी ता. घाटंजी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात एसटीची वाहक संघमित्रा जितेंद्र मोहोड (३०) रा. ब्राम्हणवाडा, दुचाकीस्वार गजानन तानबा कडू (३०) रा. खापरी ता. घाटंजी, गोविंद शाहाकार, सुमित्राबाई थूल, संजय वंजारी, गिरजाबाई झामरे, चंदू हसन रायलीवाले, हुसेन कासम रायलीवाले, विठाबाई भाऊराव दाढे, सुभद्राबाई चौधरी, बाबाराव वंजारी, निलेश वाईकर, नीता कोठेकर, चंद्रकला बानोरे, जिजाबाई घायवन, महादेव खरबकार, पोलीस शिपाई योगिता शिबाळे, गिरजाबाई तेलंग जखमी झाले. राज्य परिवहन महामंडळाची बस (एम.एच-४०-८२२९) यवतमाळवरून धामणगावकडे बुधवारी दुपारी जात होती. थाळेगाव फाट्याजवळ समोरुन भरधाव दुचाकी आली. या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. यामुळे वाहकाच्या बाजूला एसटीला मोठ्या प्रमाणात क्षती झाली. तसेच आतील प्रवासी जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून तत्काळ यवतमाळच्या व बाभूळगावच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी एसटी झाडावर आदळली. तो दुचाकीस्वार मात्र या अपघातात ठार झाला. सर्व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)