शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल न भरल्याने दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित; ६५ लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:51 IST

६५ लाखांची थकबाकी : प्रकल्प अधिकाऱ्याचा मुंबईतून कारभार

तलासरी : दापचरी दुग्ध प्रकल्पासहित कुर्झे धरणाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने  ४८ तासांपासून संपूर्ण प्रकल्प अंधारात गेला आहे. दुग्ध प्रकल्पाला महावितरणकडून विद्युत पुरवठा करण्यात येत असून वीजपुरवठ्याचे ६५ लाख २९ हजार १८० प्रकल्पाची विद्युत थकबाकी असल्याने मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. 

दापचारी दुग्ध प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी असलेले नथू राठोड हे सध्या मुंबईत बसून दापचारी प्रकल्पाचा कारभार हाकतात. त्यामुळे प्रकल्पात सावळागोंधळ आहे. प्रकल्पाची वीज थकबाकी भरा, असे वीज कंपनीचे अधिकारी यादव इंगळे यांनी २८ जानेवारी रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितले, पण ते गंभीरतेने प्रकल्प अधिकाऱ्यांनी न घेतल्याने  कृषिक्षेत्रधारकांना ४८ तासांपासून विजेअभावी काढावे लागत आहेत. प्रकल्प कर्मचाऱ्यांनी वीजबिलाचे बिडिंग केले, पण प्रकल्प अधिकारी राठोड यांनी त्यावर सही न केल्याने  थकबाकीअभावी वीजपुरवठा प्रकल्पाचा झाला.  याबाबत स्थानिक कृषिक्षेत्रधारक, प्रकल्प वसाहतमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दापचरी दुग्ध प्रकल्पातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मंत्री पाहणी दौरा करून गेल्यानंतर ही दुग्ध प्रकल्पाची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे होताना दिसून येत आहे.    

दापचरी दुग्ध प्रकल्प आशिया खंडातील एक नंबरचा आणि स्वतःचे धरण असलेला दुग्ध प्रकल्प आहे. शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे डबघाईत गेला असला तरी सध्या ही कृषिक्षेत्रधारकांकडून दुग्ध प्रकल्पात दुग्ध उत्पादन करून देण्यात येत आहे. गेल्या आठ महिन्यापासून कृषिक्षेत्रधारकांनी भरलेल्या दुधाचे पैसे  प्रकल्पाकडून अजून कृषिक्षेत्रधारकांना मिळालेले नाही. तसेच कृषिक्षेत्रधारकांना वीज, पाणी, गाईसाठी चारा मिळणार नसेल तर कृषिक्षेत्रधारकांनी थकबाकी भरायची तरी कशी? असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धरण असलेल्या प्रकल्पाची वीज महावितरणकडून थकबाकीअभावी खंडित केल्याने धरणक्षेत्रात काळोख पसरला आहे. वीजच नसल्याने धरणासह कृषिक्षेत्र, दुग्ध प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे.  

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरार