शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशेब मिळेना!

By admin | Updated: January 30, 2017 03:26 IST

तांत्रिक अडचण; वाशिम जिल्ह्यातील तीन हजार शिक्षक संभ्रमात

वाशिम, दि. २९- जिल्ह्यांतर्गत येणार्‍या सर्व प्राथमिक शाळांमधील तीन हजारांहून अधिक शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणार्‍या भविष्य निर्वाह निधीचा २0१५-१६ चा हिशेबच त्यांना सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यामुळे शिक्षकवर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्य निर्वाह निधी म्हणजे सर्वसाधारणपणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी नवृत्त झाल्यावर त्याला उर्वरित आयुष्यात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळणारी रक्कम असून, ही रक्कम शिक्षक कर्मचार्‍याच्याच वेतनातून दरमहा निश्‍चित केल्यानुसार कपात करून भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येते. या निधीतून काही रक्कम गरजेनुसार वेळोवेळी काढण्याचा अधिकारही शिक्षकांना असतो. वेतनातून भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात करण्यात येणार्‍या रकमेचा वापर कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्याच्या हेतूने संबंधित कर्मचारी किंवा शिक्षक करतात; मात्र त्यासाठी त्यांना भविष्य निर्वाह निधीत किती रक्कम आहे, त्याची माहिती असणे आवश्यक असते आणि भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र मिळाल्यानंतरच त्याचा अंदाज येऊ शकतो. २0१५-१६ या वर्षातील याबाबतचे विवरण पत्र प्राथमिक शिक्षकांना अद्याप मिळाले नाही. साधारण ऑगस्ट महिन्यात ही विवरण पत्रे त्यांना मिळायला हवीत; परंतु आता चार महिने उलटले आणि दुसरे आर्थिक वर्ष सुरू झाले तरी, जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या खात्याचे विवरण पत्रच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे शिक्षक वर्ग संभ्रमात आहे. कपात होणार्‍या जीपीएफच्या रकमेत तफावतशिक्षक आणि कर्मचारी यांचे वेतन मागील वर्षी ह्यऑनलाइनह्ण झाले. त्यामुळे त्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत बर्‍याच वेळेस तफावत येत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन वेतन अदायगीत येणारी तफावत जुळवण्यासाठी बराच वेळ लागतो. भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर शासन व्याज देते. चुकीच्या नोंदीमुळे व्याज आकारणी जास्त झाल्यास शासनाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सहावा वेतन आयोग लागल्यानंतर त्यांना देय रक्कम पाच हप्त्यात अदा करावयाची होती. ती अदा करताना हप्ता जमा केल्यानंतर त्याची नोंद सेवापुस्तकात प्रमाणक क्रमांक व दिनांकासह करणे आवश्यक आहे. सदर नोंदी वेळीच न घेतल्याने बर्‍याच कर्मचार्‍यांचे पाचपेक्षा जास्त हप्ते जमा झाले आहेत. जास्त जमा झालेले हप्ते शोधून शासन खाती जमा करणे आवश्यक आहे, तर काही ठिकाणी चुकीचे हप्ता क्रमांक नोंदवल्यामुळे कर्मचार्‍यांचे नुकसान होऊ नये, याचीसुद्धा तपासणी करावी लागत आहे. याच कारणामुळे भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र वितरित करण्यास विलंब होत आहे. तथापि, फेब्रुवारीच्या अखेरीस ही विवरण पत्रे शिक्षकांना वितरित करता येतील, असे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कनिष्ठ लेखा अधिकारी जितेंद्र मनोहर यांनी सांगितले.