शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्ष पदाच्या आरक्षणासंदर्भात सहापैकी केवळ दोनच मागण्या मान्य !

By admin | Updated: November 19, 2016 02:26 IST

वाशिमला वगळले; संघर्ष सुरू ठेवण्याचा याचिकाकर्त्याचा निर्धार

वाशिम, दि. १८- उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, शुक्रवारी मुंबईत जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत निघाली; मात्र या सोडतीत सहापैकी केवळ दोन मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते तथा वाशिम जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण हे चक्रानुक्रम पद्धतीने दरवेळेस बदलते राहावे, महिलांचे आरक्षण हे एकाच निवडणूक विभागात (जिल्ह्यात) एकाच जागेवर राहू नये, आरक्षणाचा लाभ सर्वच घटकांना मिळावा म्हणून आरक्षण हे फिरते असावे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात नमूद आहे. आरक्षणाचे चक्र पूर्ण झाल्याशिवाय तेच आरक्षण पुनश्‍च त्या ठिकाणी येऊ नये, अशी तरतूद आहे. तथापि, राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष पदाचे आरक्षण हे २0११, २0१३ व जून २0१६ या तीनही निवडणुकीत महिलांसाठीच राखीव निघाले. यासह अन्य जिल्हा परिषदांमध्ये चुकीच्या पद्धतीने आरक्षण सोडत निघाली, असा आरोप करीत वाशिम जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या आरक्षण सोडतीवर हरकत दाखल केली. या याचिकेवर निर्णय देताना विद्यमान न्यायालयाने ग्रामविकास विभागाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषदांचे फेर आरक्षण काढण्यात आले. ज्या सहा मुद्यांवर याचिका दाखल केली होती, त्यापैकी केवळ दोनच मुद्दे ग्रामविकास विभागाने मान्य केले असून, उर्वरित सहा मुद्यांबाबत फेर आरक्षण काढले नाही, असा आरोप याचिकाकर्ते विकास गवळी यांनी केला. दरम्यान, वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक पूर्वीच्या सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षणानुसार जून २0१६ मध्ये पार पडली. त्यामुळे मुंबई येथे पार पडलेल्या शुक्रवारच्या आरक्षण सोडतीमध्ये वाशिम जिल्हा परिषदेला वगळण्यात आले आहे. जे चार मुद्दे विचारात घेतले नाही, त्या मुद्यांसंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू ठेवू, असा निर्धार विकास गवळी यांनी व्यक्त केला.